SA vs IND Women's T-20 : भारताने पहिली टी-२० जिंकली | पुढारी 
Fri, Aug 17, 2018 12:31होमपेज › Sports › SA vs IND Women's T-20 : भारताने पहिली टी-२० जिंकली

SA vs IND Women's T-20 : भारताने पहिली टी-२० जिंकली

Published On: Feb 13 2018 6:18PM | Last Updated: Feb 13 2018 7:33PMपोचेफस्टरूम : पुढारी ऑनलाईन 

भारतीय महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारतने दमदार फलंदाजी करत १६५ धावांचे आव्हान १८ षटकातच पूर्ण केले. भारताकडून कर्णधार मिताली राजने ४८ चेंडूत ५४ धावा करत चांगली सुरुवात केली. तिला स्मृती मानधनाने २८ धावा करत चांगली साथ दिली. स्मृती आणि हरमनप्रीत पाठोपाठ बाद झाल्यावर रॉड्रिग्जने डाव सावरला तिने २७ चेंडूत ३७ केल्या. त्यानंतर आलेल्या वेदा कृष्णमूर्तीने ३७ धावा ठोकल्या. 

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघासमोर आफ्रिकेने १६५ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. हा निर्णय भारतासाठी योग्य ठरला नाही. आफ्रिकेने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. 

दक्षिण आफ्रिकेकडून ट्रेओनने ७ चेंडूत तब्बल ३२ धावा ठोकल्या. त्यामुळे आफ्रिका १६५ धावा करु शकला. याचबरोबर कर्णधार नेकरकने ३८ तर प्रीझने ३१ धावा केल्या. भारताकडून कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने  ४ षटकात २३ धावा देत २ बळी टिलपे. 


SA vs IND Live : भारताची मधली फळी पुन्हा ढेपाळली

अखेर ‘हिटमॅनला’ सूर गवसला