Thu, Mar 21, 2019 09:28होमपेज › Sports › ग्रास कोर्ट किंग फेडररचे आव्हन संपूष्टात 

ग्रास कोर्ट किंग फेडररचे आव्हन संपूष्टात 

Published On: Jul 11 2018 11:14PM | Last Updated: Jul 11 2018 11:14PMलंडन : पुढारी ऑनलाईन 

विम्बल्डनमध्ये आज उपांत्यफेरीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. जागतीक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला रॉजर फेडररचे आव्हान संपूष्टात आले. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने चुरशीच्या झालेल्या सामन्यात ६-२, ७-५, ५-७, ४-६, ११-१३ असा पराभव केला. या पराभवामुळे फेडररचे नवव्यांदा विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न भंगले. 

सलग पाचवेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या फेडररने उपांत्यपूर्व फेरीतच चाहत्यांची निराशा केली. पहिला सेट ६-२ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अँडरसनने कडवी झुंज दिली. फेडररने दुसरा सेट निसटता जिंकला. अँडरसनेन मिळालेला सूर याही तिसऱ्या सेटमध्ये कायम राखत हा सेट ७-५ने जिंकला. त्यानंतर चौथा सेट देखील ६-४ ने जिंकत फेडररवर दबाव वाढवला. पाचाव्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. अखेर अँडरसनने १३-११ने सेट जिंकत सामना खिशात घातला.