Sat, Apr 04, 2020 17:56होमपेज › Sports › बापापेक्षा मुलगा वरचढ

बापापेक्षा मुलगा वरचढ

Last Updated: Feb 19 2020 1:19AM
बंगळूर : वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समित बापापेक्षा सवाई कामगिरी करीत असून, त्याने एका वन-डे क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावल्याची गोष्ट समोर आली आहे.

समितने शालेय क्रिकेट स्पर्धेत हा पराक्रम केला आहे. माल्या अदिती या शाळेकडून समित हा क्रिकेट खेळतो. 14 वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीविरुद्ध खेळताना समितने द्विशतक झळकावले आहे. समितने 146 चेंडूंत 33 चौकारांच्या जोरावर 204 धावांची खेळी साकारली आहे. समितच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या शाळेला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 377 धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीच्या संघाला 267 धावांच करता आल्या आणि त्यांना 110 धावांनी पराभव पत्करावा लागला.

समितचे हे दुसरे द्विशतक ठरले आहे. यापूर्वी समितने 2019 साली खेळवण्यात आलेल्या झोनल स्पर्धेत 201 धावा केल्या होत्या. समितने ही खेळी साकारताना 256 चेंडूंचा सामना केला होता आणि 22 चौकारही लगावले होते. समितचे 14 वर्षांखालील स्पर्धेतील हे पहिले शतक होते. या सामन्यात द्विशतक झळकावल्यावर समितने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखवला होता.