Tue, Jul 23, 2019 00:53होमपेज › Sports › WorldCup2019मध्ये पाकिस्तानची १९९२ सारखीच वाटचाल?

WorldCup2019मध्ये पाकिस्तानची १९९२ सारखीच वाटचाल?

Published On: Jun 26 2019 4:27PM | Last Updated: Jun 26 2019 4:27PM
बर्मिंगहॅम : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तान संघाची इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये सुरुवात खराब झाली होती. वर्ल्डकपआधी इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका ४-१ ने हरलेल्या पाकिस्तानला अफगाणिस्तानने सरावर सामन्यात पराभवाची धुळ चारली होती. पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकमध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी २ जिंकले तर ३ हरले आहेत. त्याचा एक सामना वॉश आऊट झाला. सध्या ते ५ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये ७व्या क्रमांकावर आहेत. पुढील ३ सामन्यात चांगली कामगिरी करुन सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता त्यांची धडपड सुरु आहे. जरी पाकिस्तानवर खराब खेळावरुन मायदेशातून तुफान टीका होत असली तरी आकडेवारूवरुन त्यांची १९९२ ला जिंकलेल्या वर्ल्डकपप्रमाणेच वाटचाल सुरु आहे. 

पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यात तब्बल ८९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर मायदेशातून तुफान टीका होत होती. ही टीका जोपर्यंत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा ४९ धावांनी पराभव केला नाही तोपर्यंत सुरुच होती. पण आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या ६ सामने आणि १९९२ चा वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तानी संघाची वाटचालीमध्ये समानता आहे. पाकिस्तानने आपला दोन्ही वर्ल्डकपमधील वेस्ट इंडिज विरुद्धचा सलामीचा सामना गमावला होता. याच बरोबर दोन्ही वर्ल्डकपमध्ये तिसराच सामना वॉशआऊट झाला होता. 

ज्याप्रामणे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पहिला पराभव, दुसरा विजय, तिसरा वॉश आऊट,चौथा पाचवा पराभव आणि सहाव्या सामन्यात पुन्हा विजय मिळवला आहे. १९९२ लाही अशाच प्रकारे वर्ल्डकपविजेत्या पाकिस्तान संघाचा प्रवास राहिला. १९९२ ला इम्रान खानच्या नेतृत्वाखालील संघाने सातवा सामना जिंकला होता. आज पाकिस्तानचा मुकाबला वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अपराजीत राहिलेल्या न्यूझीलंड बरोबर होत आहे. आता या सामन्याचा निकाल काय लागतो सर्वांना याची उत्सुकता लागली आहे.