Sat, Mar 28, 2020 20:26होमपेज › Sports › पंढरीनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार

पंढरीनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार

Last Updated: Feb 19 2020 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कुस्तीला नावारूपास आणण्यास मेहनत घेणारे पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुंबईमध्ये क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्य मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 2018-19 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्कारांमध्ये जीवनगौरवसह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांमध्ये खेळासाठी योगदान देणार्‍या खेळाडूंचा समावेश आहे. या पुरस्कारांसोबत खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 गुवाहाटी (आसाम) मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या राज्यातील खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. 2018-19 वर्षासाठी एकूण 63 जणांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सांगलीचे युवराज बाळू खटके (अ‍ॅथलेटिक्स), बीडचे बाळासाहेब आवारे (कुस्ती), पुण्याचे नितीन प्रभाकर खत्री (तायक्वाँदो), पुण्याचे जगदीश मनोहर नानजकर (खो-खो) आणि कोल्हापूरचे अनिल बंडू पोवार (पॅरा अ‍ॅथलेटिक्स) यांना देण्यात येणार आहे. शनिवारी 22 फेब्रुवारीला 5 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा होणार आहे.

पठारे यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
सन 2018-19 चा क्रांतिसिह नाना पाटील जीवन गौरव पुरस्कार
सन 2018-19 वर्षाचा पुणे जिल्हा कुस्ती संघटक पुरस्कार 
सन 2017-18 मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, जांभूळवाडी, पुणे यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार 

कार्यकर्ता, संघटकांसाठी वेगळा विचार सुरू
यंदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीतून कार्यकर्ते, संघटकांसाठी पुरस्कार देण्यात आलेला नाही. यावर राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राज्य क्रीडा पुरस्कार हा आपल्या राज्यातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. यासाठी फक्त खेळाडूंच्याच नावाचा विचार करायला हवा. कार्यकर्ते, संघटकांसाठी आमचा वेगळा विचार सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात शालेय स्तरावर चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात; पण कॉलेज स्तरावर मात्र क्रीडा स्पर्धांचा अभाव दिसून येतो. मुंबईसह महाराष्ट्रातील युवकांना कॉलेज स्तरावरही अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असे सुनील केदार यांनी सांगितले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2018-19
शिवछत्रपती जीवन गौरव राज्य क्रीडा पुरस्कार  (सन 2018-19) :
 पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे, पुणे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (सन 2018-19)
युवराज बाळू खटके, सांगली (अ‍ॅथलेटिक्स)
बाळासाहेब भगवान आवारे, बीड, (कुस्ती) थेट पुरस्कार
नितीन प्रभाकर खत्री, पुणे (तायक्वाँदो)
जगदीश मनोहर नानजकर, पुणे (खो-खो )
अनिल बंडू पोवार, कोल्हापूर (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) (सन 2018-19 )
खो-खो :
हर्षद विजय हातणकर(मुंबई शहर), कविता प्रभाकर घाणेकर (ठाणे).
कबड्डी : रिशांक कृष्णा देवाडिगा (मुंबई उपनगर) (थेट पुरस्कार) सोनाली विष्णू शिंगटे, मुंबई शहर (थेट पुरस्कार), गिरीष मारुती इरनक (ठाणे) (थेट पुरस्कार) 
सायकलिंग : अविन जितेंद्र पाटील (भंडारा), मधुरा चंद्रकांत वायकर (मुंबई शहर). 
आट्यापाट्या : पवन चंदनलाल जैस्वाल (वाशिम), प्रिया श्रीराम गोमासे (भंडारा)
कुस्ती : अभिजित चंद्रकांत कटके (पुणे), अंकिता दिनेश गुंड (पुणे)
कयाकिंग- कनोईंग : सुलतान नुरखा देशमुख (नाशिक)
व्हॉलीबॉल : प्रियांका अशोक खेडकर, पुणे
स्केटिंग : सिद्धांत राहुल कांबळे ( पुणे), साक्षी महेश माथवड( पुणे)
वुशु : प्रियांका विजयकुमार गौडा (मुंबई शहर)
जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो : हर्षल पियुष वखारिया, पुणे (जलतरण), अवंतिका सुधीर चव्हाण, मुंबई उपनगर (जलतरण), सिद्धार्थ बजरंग परदेशी, नाशिक (ड्रायव्हिंग), मानसी रवींद्र गावडे रायगड, (वॉटरपोलो).
आर्चरी : सुकमनी गजानन बाबरेकर (अमरावती)
अ‍ॅथलेटिक्स : किसन नरशी तडवी (नाशिक), अर्चना रामदास आढाव (पुणे) 
बास्केटबॉल : श्रुती अरविंद (पुणे)
सॉफ्टबॉल : पीयूष रवी आंबुलकर (नागपूर), ईश्वरी उत्तमराव गोतमारे (अमरावती)
जिम्नॅस्टिक्स : गौरव अविनाश जोगदंड (औरंगाबाद) जिम्नॅस्टिक्स (अ‍ॅरोबिक्स) आदिती अजित दांडेकर 
(मुंबई शहर) श्रावणी अजित राऊत (ठाणे) जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक)
नेमबाजी : वेदांगी विराग तुळजापुरकर (मुंबई शहर)
तलवारबाजी : तुषार रावसाहेब आहेर (औरंगाबाद), दामिनी मनोहर रंभाड, (नागपूर)
बॉक्सिंग : अनंता प्रल्हाद चोपडे, अकोला
रोईंग : सूर्यभान तानाजी घोलप (नाशिक), जागृती सुनील शहारे (नाशिक)
तायक्वांडो : निरज दिलीप चौधरी (धुळे), रुचिका श्रीरंग भावे. (पुणे)
बॅडमिंटन : विघ्नेश गणेश देवळेकर( ठाणे), संयोगिता रणजितसिंग घोरपडे (पुणे)
मल्लखांब : गणेश वामन शिंदे (मुंबई उपनगर), हिमानी उत्तम परब, (थेट पुरस्कार), मुंबई शहर
शरीरसौष्ठव : योगेश कमलाकर मेहर (पालघर), करुणा पांडुरंग वाघमारे, (मुंबई उपनगर)
हॉकी : आकाश अनिल चिकटे( यवतमाळ)
यॉचिंग : श्वेता प्रभाकर शेरवेगार (थेट पुरस्कार),
बेसबॉल : गिरीजा सुनील बोडेकर (कोल्हापूर)
पॉवरलिफ्टिंग : नीलेश बाळकृष्ण गराटे( मुंबई उपनगर), सोनाली छबुराव गिते, (मुंबई शहर)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) 2018-19
प्रभात राजू कोळी, मुंबई (खाडी पोहणे) (थेट पुरस्कार)
शुभम धनंजय वनमाळी, ठाणे (खाडी पोहणे)
अपर्णा अरविंद प्रभुदेसाई़, (पुणे) गिर्यारोहण
सागर राजीव बडवे, औरंगाबाद

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) 2018-19
स्वप्निल संजय पाटील ,कोल्हापुर, (जलतरण) (थेट पुरस्कार )
पार्थ किशोर हेंद्रे ,मुंबई, (जलतरण), सायली सुनील पोहरे़, नाशिक (जलतरण)
जयदीपकुमार हृदया सिंह मुंबई (ज्युदो), वैष्णवी विनायक सुतार, कोल्हापूर (टेबल टेनिस)