'फॉलो ऑन' देण्यात विराट सर्वात वरचढ 

Last Updated: Oct 21 2019 6:15PM
Responsive image

Responsive image

रांची : पुढारी ऑनलाईन 

भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी कर्णधार झाल्यापासून एक एक शिखरे पादाक्रांत करत आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताना पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्यानंतर  रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन देत विजयाकडे कूच केली आहे. या मालिकेत विराटने दक्षिण आफ्रिकेला दोनवेळा फॉलो ऑन दिला आहे. याच बरोबर फॉलो ऑन देण्याबाबात विराटने विक्रमही केला. 

रांची येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेसमोर ४९७ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. भारताने आफ्रिकेला फॉलो ऑन देत दुसऱ्या डावातही १३२ धावात ८ फलंदाज माघारी धाडले आहेत. त्यामुळे उद्या चौथ्या दिवशी भारताच्या विजयाची औपचारिक्ताच बाकी राहिली आहे. विराटने कसोटी कर्णधारपद आपल्या हातात घेतल्यापासून आतापर्यंत आठवेळा प्रतिस्पर्धी संघाला फॉलो ऑन दिला आहे. याच बरोबर विराट हा प्रतिस्पर्ध्यांना सर्वाधिकवेळा फॉलो ऑन देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने महोम्मद अझरुद्दीनला (७ वेळा) मागे टाकले.