होमपेज › Sports › केन विल्यम्सन, अकिला धनंजयच्या बॉलिंग अॅक्शनवर आक्षेप 

केन विल्यम्सन, अकिला धनंजयच्या बॉलिंग अॅक्शनवर आक्षेप 

Published On: Aug 20 2019 2:52PM | Last Updated: Aug 20 2019 2:52PM
गाले : पुढारी ऑनलाईन 

वर्ल्डकप उपविजेता न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन आणि श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकिला धनंजया यांच्या गोलंदाजीवर शंका वक्त केली जात आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यत नुकतीच गाले येथे कसोटी सामना झाला होता. या सामन्यांनंतर आयसीसीने याची माहिती दिली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या संघ व्यवस्थापनांना याचा अहवाल देण्यात आला आहे. यात विल्यम्सन आणि धनंजयाच्या बॉलिंग अॅक्शनच्या वैधतेबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. येत्या १४ दिवसात या दोघांच्या बॉलिंग अॅक्शनची चाचणी होणार आहे. पण, तोपर्यंत दोघेही गोलंदजी करु शकतात. 

आयसीसीने जाहीर केलेल्या आपल्या वक्तव्यात ' न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजया यांच्या गोलंदाजीबाबत १४ ते १८ ऑगस्टमध्ये पहिल्या कसोटीदरम्यान शंका उपस्थित केली आहे. असे म्हटले आहे. विल्यम्सनने या सामन्यात दुसऱ्या डावात फक्त ३ षटके टाकली होती. तसेच त्याने ७३ कसोटीत २९ विकेट घेतल्या आहेत. तो क्वचितच गोलंदाजी करतो. तर अकिला धनंजयाने श्रीलंकेकडून ६ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने २४.८१ च्या सरासरी ३३ विकेट घेतल्या आहेत. 

धनंजयाने गाले कसोटीत ६ विकेट घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात ५ विकेट घेत किवींचा निम्मा संघ माघारी धाडला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेकडे आता १-० अशी आघाडी आहे.