Sat, Apr 04, 2020 17:36होमपेज › Sports › कबड्डी संघाच्या पाक दौर्‍याची चौकशी

कबड्डी संघाच्या पाक दौर्‍याची चौकशी

Last Updated: Feb 19 2020 1:19AM
अमृतसर : वृत्तसंस्था
विनापरवाना पाकिस्तान दौर्‍यावर गेलेल्या भारतीय कबड्डी संघाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी राष्ट्रीय कबड्डी फेडरेशनला दिले आहेत. तर, आम्ही प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर पाकिस्तानला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे या संघाचे प्रमोटर देविंदर सिंग बाजवा यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या सर्कल कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ सहभागी झाला होता. या संघाला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले होते. हा संघ वाघा-अटारी मार्गे भारतात रविवारी परतला. 

क्रीडामंत्री म्हणाले की, आमचा कोणताही अधिकृत संघ पाकिस्तानला गेला नव्हता. जे गेले होते, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. ते विनापरवाना गेले होते, आणि तेथे त्यांनी भारताचे नाव अधिकृत परवानगी न घेता का वापरले याची चौकशी करण्याचे आदेश मी कबड्डी महासंघाला दिले आहेत.