Fri, Nov 24, 2017 20:07होमपेज › Sports › हार्दिकचा हटके लूक

हार्दिकचा हटके लूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था 

२१ जुलै पासून सुरू होणा-या श्रीलंका दौऱ्या आधीच हार्दिक पंड्याने आपल्या हेअरस्टाईलचा हटके लूक केला आहे. इंस्टाग्रामवर या नव्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर करून त्याने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला असून यात हार्दिकचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. हार्दिकच्या चाहत्यांना त्याची ही नवी हेअरस्टाईल जाम आवडली आहे. इंस्टाग्रामवरच्या त्याच्या हटके 'स्टाईल'ला भरपूर 'लाईक्स' मिळत आहेत. प्रसिद्ध हेअर ड्रेसर आलिम हाकिम यांनी ही हेअरस्टाईल केली आहे. 

हार्दिक पंड्याने हेयर स्टाइलिस्ट आलिम हाकिमला 'जादुगार' म्हटले आहे. 'आलिम हाकिम हे हटके हेअरस्टाईल करण्यात जादुगार आहेत. आणि म्हणूनच ते आम्हाला आवडतात.' असे म्हणून हार्दिकने हाकिम यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. 

आलिम हाकिम हे बॉलीवूडचे सिलेब्रिटी हेयर स्टाइलिस्ट असून त्यांची केस कापण्यासाठी सुरुवातीची फी २० हजार इतकी आहे. ज्यांच्या क्लायंटची लिस्ट पहिली तर तुम्ही चक्रावून जाल. हृतिक रोशन, रणबीर कपूर, वरुण धवन यांच्या सह अनेक सेलीब्रेटी अभिनेते तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडू हेअरस्टाईल करण्यासाठी हाकिम यांच्याकडे येत असतात. 

I have to say you are a true magician @aalimhakim .. I so loved it👌🏻

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on