Thu, Jun 27, 2019 10:03होमपेज › Sports › गचाळ विकेट किपिंगने पंतचा घात केला 

गचाळ विकेट किपिंगने पंतचा केला घात

Published On: Apr 15 2019 5:17PM | Last Updated: Apr 15 2019 5:17PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप २०१९साठी भारतीय संघाची आज (दि.१५) बीसीसीआयने घोषणा केली. वर्ल्डकपसाठी काही जागा सोडल्या, तर भारताने आपली संघबांधणी केव्हाच पक्की केली होती. या काही जागांमध्ये धोनीला बॅकअप विकेटकिपरची जागा प्रामुख्याने चर्चेत राहिली. निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी संघ जाहीर करत दिनेश कार्तिकवर आपली मोहर उमटवली आणि पंतचे पहिला वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न तुर्तास तरी अधुरे राहिले. 

इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणातच धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतने थोड्याच कालावधीत क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. त्याने कसोटीत बॅटिंग बरोबरच विकेट किपिंगमध्येही आपली चुणूक दाखवली. त्यानंतर त्याची फिअरलेस बॅटिंग पाहून आपण हाच धोनीचा वारसदार असा शिक्का मारुन रिकामे झालो. पण, कसोटीत जरी त्याने विकेट किपिंगमधील विक्रम एका पाठोपाठ एक मोडले असले तरी, गेल्या काही वनडे सामन्यांमध्ये आणि आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये पंतची गचाळ विकेट किपिंग हा संघासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. हाच मुद्दा त्याच्या आणि वर्ल्डकपचे तिकिट मिळवण्याच्या आड आला. 

वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी पंतचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. कारण पंतने गेल्या काही सामन्यात केलेली फलंदाजी पाहता त्याचे वर्ल्डकप तिकिट फिक्स मानले जात होते, पण निवड समितीने अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देत पंतच्या अरमानांवर पाणी फेरले. तसे पाहिले तर पंतने आपल्या हाताने आपला घात करुन घेतला आहे. त्याच्या गचाळ विकेट किपिंगने त्याचा पत्ता कट झाला आहे.

ज्यावेळी प्रसाद यांनी पंत ऐवजी कार्तिकला संधी का देण्यात आली? असे विचारले असता  त्यांनी दबावाच्या वेळी विकेट किपिंग तसेच फलंदाजी चांगला करणारा विकेट किपर हवा म्हणून कार्तिकला संधी दिली. तसेच पंत जवळपास पोहचला होता पण, विकेट किपिंगमध्ये कर्तिक उजवा आहे. त्यामुळे त्याला संधी मिळाली.