Tue, Sep 17, 2019 21:57होमपेज › Sports › ६ मे पासून रंगणार ‘वुमन्स टी २० चॅलेंज’

६ मे पासून रंगणार ‘वुमन्स टी २० चॅलेंज’

Published On: Apr 24 2019 8:07PM | Last Updated: Apr 24 2019 8:07PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

भारतात सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १२ व्या हंगामातील सामन्यांमध्ये चांगलीच रंगत आली आहे. यामुळे क्रीडाप्रेमीमध्ये सर्वत्र आयपीएलचीच चर्चा सुरू आहे. या आयपीएलच्या धामधुमीत आता क्रीडाप्रेमींना महिला क्रिकेटपटूचेही चौकार, षटकार पहायला मिळणार आहेत. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठीही टी २० चॅलेंजचे आयोजन केले आहे. ६ ते ११ मे दरम्यान या सामन्यांना शुभारंभ होणार आहे.

‘वुमन्स टी २० चॅलेंज’ असे या स्पर्धेचे नाव आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी असे तीन संघांमध्ये हे सामने रंगणार आहेत. या संघातील तीन सामन्यांनंतर गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघात अंतिम लढत होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारतातील आणि जगातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. 

गेल्या वर्षी IPL मध्ये दोन संघांमध्ये महिलांची IPL स्पर्धा रंगली होती. यामध्ये स्मृती मानधनाचा ट्रेलब्लेझर्स संघ आणि हरमनप्रीत कौरचा सुपरनोव्हाज संघ यांच्यात लढत झाली होती. हा सामना प्रदर्शनीय पद्धतीचा होता. या सामन्यात परदेशी महिला क्रिकेटपटू एलिस पेरी, मेग लॅनिंग, एलिसा हिली, बेथ मूनी, सूजी बॅट्स आणि सोफी डेव्हीयन यांचा समावेश होता. या सामन्यांच्या यशामुळे आता या वर्षी ३ संघामध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. पुरुष IPL 2019 चे साखळी सामने संपल्यानंतर हे सामने होणार आहेत. हे सर्व सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत. 

असे रंगतील ‘वुमन्स टी २० चॅलेंज’चे सामने

६ मे – सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
८ मे – ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
९ मे – सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी 
११ मे – अंतिम सामना