Sat, Jul 04, 2020 08:23होमपेज › Sports › एकच चर्चा शिगेला; टी-२० वर्ल्डकप होणार की नाही?

एकच चर्चा शिगेला; टी-२० वर्ल्डकप होणार की नाही?

Last Updated: May 27 2020 2:31PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण, याबाबतचा अंतिम निर्णय हा आयसीसीच्या उद्या ( दि. 28 मे) रोजी होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीतच होणार आहे.  

आयसीसीची क्रिकेट समिती ही उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या भवितव्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. आयसीसीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्डकप हा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील सर्वात महत्वाचा विषय असणार आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीही अपस्थिती दर्शवणार आहेत. 

वाचा : गब्बरने सांगितला निवृत्तीनंतरचा प्लॅन!

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आयसीसीची बोर्ड मिटिंग दुपारी 12 वाजता नियोजित आहे. बोर्ड मेंबर या मिटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलण्याची मोठी शक्यता आहे. पण, आतापर्यंत याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच चर्चेवेळी या विषयासंदर्भात काही पर्यायही ठेवण्यात येतील. पण जवळपास ही स्पर्धा 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे असा दावाही या सुत्राने केला आहे.

वाचा : 'फ्लाईंग बुलेट'ची 18 वी स्क्वॉड्रन कार्यान्वित होणार

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कॉलबेक यांनी कोरोना संकटात प्रेक्षकाना सांभाळणे ही या वर्षीच्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप हा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. पण, सध्या कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्व क्रिकेट सामने, सराव शिबिरे स्थगित करण्यात आले आहेत. तसेच पुरुष टी-20 वर्ल्डकपचे भवितव्यही अधांतरीच आहे.