होमपेज › Sports › थायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने 

थायलंड महिला क्रिकेट संघाचे अनोखे अभिवादन, जिंकली सर्वांची मने 

Last Updated: Feb 24 2020 1:30AM
सिडनी : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियात महिला टी - 20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत काल (दि.22) थायलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला. वेस्ट इंडिजच्या तगड्या संघाने वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या थायलंडचा 7 विकेट राखून आरामात पराभव केला. पण, जरी थायलंडचा पराभव झाला असला तरी त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. 

वेस्ट इंडिजने  आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडला 78 धावात रोखले. त्यानंतर त्यांनी हे आव्हान 20 चेंडू आणि सात विकेट्स राखून पार केले. सामना संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमानंतर थायलंडच्या महिला संघाने एका ओळीत उभारत एकत्रित सर्व दिशेला वाकून नमस्कार करत प्रेक्षकांना अभिवादन केले. या अभिवादनाचा व्हिडिओ आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.