होमपेज › Sports › 'तर मी देशासाठी बंदूक उचलायला तयार'

'तर मी देशासाठी बंदूक उचलायला तयार'

Last Updated: May 18 2020 1:28PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

जगभरात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. बहुतांश देश कोरोनाविरूद्ध लढत आहेत. देश संकटाच्या काळात असताना माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावरून गरळ ओकली आहे. ट्विट करत त्याने काश्मीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्याच्या या वादग्रस्त ट्विटला प्रत्युत्तर देत फिरकीपटू हरभजन सिंगने मर्यादित राह नाही, तर देशासाठी बंदूकही उचलायला तयार असल्याचे सांगत  त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. हरभजन सिंगसोबत इतरही क्रिकेटपटूंनी अफ्रिदीविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी कुटुंबीयांसाह मुंबईतून उत्तर प्रदेशात पोहोचला आणि...

शाहिद आफ्रिदीने ट्विट करत काश्मीर लोकांसंदर्भात खोचक टिप्पणी करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काश्मिरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे (#SaveKashmir) अशा आशयाचे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले. तसेच, मोदी हे धर्माचे राजकारण करतात. अशी गरळ ओकत काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणीदेखील त्याने केली होती. 

बासीसीआयची तुर्तास खेळाडूंच्या मानधनाला कात्री नाही 

आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानावर संताप व्यक्त करत हरभरजन सिंगने आफ्रिदीचा आणि माझा आता काहीही संबंध नाही. आफ्रिदी माझ्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही बोलला, ते खूपच चुकीचे आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. आफ्रिदीच्या करोनाबाबतच्या उपक्रमाला आम्ही मदतीचे आवाहन करावे असे त्याने स्वत: आम्हाला सांगितले म्हणून आम्ही आवाहन केले होते. आम्ही माणुलकीच्या नात्याने त्याच्या उपक्रमाला मदत केली कारण तो करोनाबाधितांना सहाय्य करत होता.

'तर देशात महागाईचा भडका उडणार '  

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते की करोनाविरूद्धचा लढा हा धर्म, जात किंवा सीमेच्याही पलीकडचा आहे. त्यामुळे आमच्या डोक्यात स्पष्ट होते की आम्ही ही मदत करोनाबाधितांसाठी करत आहोत. पण हा माणूस आमच्याच देशाबद्दल वाईट बोलतो. त्याला भारताविरोधात बोलायचा काहीही अधिकार नाही. त्याने त्याच्या देशात आणि मर्यादेत राहावे असे सडेतोड उत्तर हरभजन सिंगने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. 

तसेच, २० वर्ष मी माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केलेय. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. आज असो किंवा उद्या… देशाला माझी गरज भासली, तर देशासाठी बंदूक घेऊन सीमेवर जाणारा मी पहिला असेन असा इशारादेखील भज्जीने यावेळी दिला. 

कोरोनामुळे मुंबईच्या क्रिकेटरचे झोपडीतून घरात जाण्याचे स्वप्न भंगले 

हजभजन सिंगसोबत गौतम गंभीर, युवराज सिंग आणि शिखर धवन यांनीदेखील आफ्रिदीला खडेबोल सुनावले. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे आणि तुम्हाला अजून काश्मीरचे पडले आहे. काश्मीर आमचे आहे आणि आमचेच राहणार. तु २२ करोड घेऊन ये , मात्र हे आमच्या एक सव्वा लाखाच्या बरोबर आहे. बाकी राहिलेली तूच बेरीज करत बस असा संताप धवनने व्यक्त केला आहे. तर ७० वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, असे कडक उत्तर गंभीरने दिले आहे.