Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Sports › इंग्लंडचा विजय म्हणजे आम्ही वाईट खेळलो असे नव्हे : कोहली

इंग्लंडचा विजय म्हणजे आम्ही वाईट खेळलो असे नव्हे : कोहली

Published On: Sep 13 2018 1:52AM | Last Updated: Sep 12 2018 11:23PMलंडन : वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्ध मंगळवारी संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 4-1 ने पराभव पत्करावा लागला. या पराभवाबद्दल बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, कसोटी मालिका 4-1 ने गमावलो असलो तरी याचा अर्थ आम्ही मालिकेत खराब खेळलो, असा होत नाही. 

मंगळवारी शेवटच्या कसोटीत पराभव पत्करल्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, 4-1 हा स्कोअर ठीक आहे. कारण, इंग्लंडने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. मात्र, लॉर्डस्वरील सामना वगळता आम्ही अन्य सामन्यांत खराब कामगिरी केलेली नाही. आम्ही ज्या पद्धतीने या मालिकेत खेळ केला ते भलेही स्कोअर कार्डवर दिसत नसले, तरी दोन्ही संघांना कल्पना आहे की, या मालिकेत कोणत्या प्रकारचा संघर्ष होता. 

या मालिकेतील पाचवी कसोटी कूकसाठी शेवटची होती. कूकच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन करून कोहली म्हणाला की, या खेळाडूसाठी केवळ एकच शब्द बोलेन. तुझी कारकीर्द शानदार ठरली आणि तुझ्या उज्ज्वल भविष्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा. 

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक म्हणाला, माझा शेवटचा सामना याच्यापेक्षा अधिक चांगला झालाच नसता. खरोखरच हा आठवडा माझ्यासाठी अत्यंत चांगला ठरला.