Sun, Jan 19, 2020 16:23होमपेज › Sports › असा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन 

असा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन 

Published On: Jul 20 2019 7:49PM | Last Updated: Jul 20 2019 7:50PM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडने ४४ वर्षानंतर पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. या ऐतिहासिक संघाचा कर्णधार इऑन मार्गनवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण, लॉर्ड्सवर फायनलचा जो निकाल आला तो निकाल योग्य नसल्याचे मत त्याने व्यक्त केले. त्याने न्यूझीलंडने कोणत्या कारणाने सामना हरला हे सांगणे फार कठीण आहे. कारण सामना बरोबरीत होता असे सांगितले. 

ऐतिहासिक लॉर्ड्सवर यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड याच्यात झालेल्या वर्ल्डकप फायनल सामना टाय झाला. त्यानंतर टायब्रेकरसाठी सुपर ओव्हरही खेळवण्यात आली. पण, तीही टाय झाल्याने अखेर सामन्यात ज्या संघाने अधिक बाऊंडरिज मारल्या त्यांना विजेता घोषित करण्यात आले. या सामना निकालात काढण्याच्या पद्धतीवर बऱ्याच जाणकारांनी नाराजी व्यक्त केली होती. वर्ल्डकप फायनलचा निकाल अशा पद्धतीने लावणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. या सर्व गोष्टीवर वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडचा कर्णधार मॉर्गननेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

मॅर्गनने ‘मी कधही तळ्यात-मळ्यात रहात नाही. फायनलमध्ये जे काही घडले त्याचा मी साक्षीदार आहे पण, मी यामुळे सामना जिंकला आणि यामुळे हरला हे सांगू शकत नाही. जिंकण्यामुळे या गोष्टी सोप्या झाल्या आहेत असे मी ठामपणे सांगू शकत नाही. नक्कीच अशा परिस्थिती हरणे हे खूप कठिण असते. त्यामुळे आम्ही खरच पात्र होतो का हे सांगणे अत्यंत कठीण आहे.’   

विल्यम्सननेही आम्ही सामना निसटू दिला किंवा तुम्ही सामन्यावर पकड मिळवली असा क्षण आला नाही या निष्कर्षाप्रत आल्याचे मॉर्गनने सांगितले. तसेच ही क्रिकेट इतिहासातील एक ग्रेट मॅच होती असही मॉर्गनने सांगितले.