Sun, Jul 05, 2020 04:05होमपेज › Sports › वॉर्नर मोठ्या मनाचा; छोट्या चाहत्याला दिली भेट

वॉर्नर मोठ्या मनाचा; छोट्या चाहत्याला दिली भेट

Published On: Jun 13 2019 2:06PM | Last Updated: Jun 13 2019 3:40PM
टॉन्टन : पुढारी ऑनलाईन

क्रिकेट विश्वचषक २०१९ मधील १७ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पॉईंट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरचा महत्त्वाचा वाटा आहे. चेंडू कुरतडल्या प्रकरणात एका वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर वार्नरने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याने १०७ धावांची खेळी केली. पण त्याने मिळालेला मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड छोट्या चाहत्याला दिला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सामन्यानंतर ३२ वर्षाच्या वार्नरला मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड ने गौरवण्यात आले पण त्याने तो पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या छोट्या चाहत्याच्या हाती सोपावला. आतंरराष्ट्रीय क्रिकेट नियमक मंडळाशी बोलताना छोटा चाहता म्हणला, खुप मस्त वाटलं. मी केवळ ध्वज फडकवत होतो. अचानक वार्नर माझ्याजवळ आले आणि त्यांनी त्यांचा पुरस्कार माझ्या हाती सोपावला. मी त्यांचा चाहता आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयावर मी खुप खुश आहे. असेही त्या छोट्या चाहत्याने आयसीसीशी बोलताना सांगितले. 

डावखुरा फलंदाज वार्नरने पुन्हा एकदा मैदानात जबरदस्त पुनरागमन केले आहे. चेंडू कुरतडल्या प्रकरणी त्याच्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक वर्षाची बंदी घातली होती.