Wed, Jun 03, 2020 22:21होमपेज › Sports › अध्यक्ष दादाने हरभजनकडे मागितला पाठिंबा  

अध्यक्ष दादाने हरभजनकडे मागितला पाठिंबा  

Last Updated: Oct 18 2019 1:56AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेणार आहे. भारताचा माजी कर्णधार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भुषवणार आहे. त्याने नुकताच आपल्या नव्या टीमचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. यात जय शहा, अरुण धुमाळ, जयेश जॉर्ज आणि माहिम वर्मा यांचा समावेश आहे. 

सौरभ गांगुली जरी मोठ्या पदावर पोहचला असला, तरी तो आपल्या आधीच्या संघाला विसरला नाही. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने सौरभ गांगुलीचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. यात त्याने 'तू असा लिडर आहेस ज्याने अनेकांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम केले. बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याबद्दल तुझे अभिनंदन.'

दादा इतक्या मोठ्या पदावर पोहणार असला, तरी तो आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरला नाही. त्याने हरभजनच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना 'आभारी आहे भज्जू.... ज्या प्रकारे तू भारताला सामना जिंकून देण्यासाठी एका बाजूने गोलंदाजी करत होतास तसाच तुझा पाठिंबा आता मला हवा आहे.' असे ट्विट केले. त्याच्या या ट्विटचा संदर्भ प्रथम श्रेणी क्रिकेटचा आर्थिक स्तर सुधारण्याबाबत असू शकतो. कारण भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत सर्वात प्रथम म्हणजेच २०१७ मध्ये हरभजन सिंगनेच आवाज उठवला होता. याबाबत त्याने त्यावेळच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक पद भुषवत असलेल्या अनिल कुंबळेला पत्रही लिहिले होते.

सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत याच विषयासंदर्भात काम करणार असल्याचे सुतोवाच दिले होते.