होमपेज › Sports › शामीचा करार रद्द करण्याचा अधिकार BCCI ला नाही : बंडोपाध्याय

शमीचा करार रद्द करण्याचा अधिकार BCCI ला नाही : बंडोपाध्याय

Published On: Mar 13 2018 7:54PM | Last Updated: Mar 13 2018 8:45PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच बीसीसीआयने त्याचा करार रद्द केला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर त्याला गुन्हा सिध्द होण्याच्या आधीच शिक्षा सुनावल्याची भावना व्यक्त होत होती. आता बीसीसीआयच्या माजी कयदेशीर सल्लागार उशानाथ बंडोपाध्याय यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. 

‘बीसीसीआयने शमीच्या पत्नीने आरोप केल्यामुळे जर का शमीचा करार रद्द केला असेल तर हे कायद्याला धरून नाही. कोणताही आरोपी हा कोर्टाने तो गुन्हेगार असल्याचा निर्णय देत नाही तोपर्यंत तो आरोपीच असतो. त्यामुळे निव्वळ पत्नीने केलेल्या आरोपामुळे शमीचा करार रद्द करण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही.’ बंडोपाध्याय यांनी असे वक्तव्य केले आहे. 

शमी आणि त्याच्या पत्नीच्या वादात रोज काही ना काही नवीन माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रचंड साशंकता निर्माण झाली आहे. यातच बीसीसीआयने शामीचा करार कोणत्या कारणास्तव रद्द केला हे सांगितलेले नाही. त्यामुळे बीसीसीआयने जर कामगिरीच्या आधारावर शमीचा करार रद्द केला असेल तर ठीक आहे. नाहीतर बीसीसीआय खेळाडूंसाठी एक नियम आणि अधिकाऱ्यांसाठी दुसरा नियम लावते असेच म्हणावे लागेल. कारण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावर आरोप झाले होते त्यावेळी बीसीसीआय त्यांना शेवटपर्यंत पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता.   

बीसीसीसीआयची खेळाडूंच्या बाबत ‘वापरुन सोडून देण्याची’ भूमिका असल्याचे दिसत आहे. कारण याच शमीने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेच्या आधी गुडघ्याला गंभीर इजा झाली असताना संघाच्या गरजेसाठी स्पर्धेतून माघार न खेळण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर शमीने अपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती. त्यानंतर जवळपास १ वर्ष तो संघाच्या बाहेर होता.