ऑस्ट्रेलियाची नजर इंग्लंडमध्ये जिंकण्याकडे

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:43PM
Responsive image


लंडन : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या कसोटी सामन्यांसाठी जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा त्यांचे ‘लक्ष्य’ 2001 नंतर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकण्याकडे असणार आहे. यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या स्टिव्ह स्मिथ याच्या खांद्यावर संघाची मदार असेल.

टीम पेनेच्या या संघाने ओल्ड ट्रॅफर्डला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. एक सामना शिल्लक असताना ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस आपल्याकडे राहील हे निश्चित केले. मालिका बरोबरीत राखायची असल्यास विश्वचषक विजेत्या इंग्लंडला स्मिथला रोखण्याचे आव्हान असेल. स्मिथने पाच डावांत 134 पेक्षा अधिकच्या सरासरीने 671 धावा केल्या आहेत. चेंडूशी छेडछाडप्रकरणी वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या स्मिथने मँचेस्टरमध्ये द्विशतकासह तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाची ताकद त्यांची जलदगती गोलंदाजी आहे. जोश हेझलवूड आणि जगातील अव्वल मानांकित गोलंदाज पॅट कमिन्सने एकूण 42 विकेटस् मिळवल्या आहेत. जगातील अव्वल कसोटी फलंदाज व गोलंदाज संघात असल्याने प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या अडचणीदेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे इतर खेळाडूंकडून देखील त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नंदुरबार झेडपीच्या सभापती पदावरून काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच 


नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला बजावली नोटीस


नम्रताने ४ वर्षांनी लहान महेश बाबूशी बांधली होती लगीनगाठ


पनवेल पालिका कर्मचारी मंत्रालयाला देणार धडक (video)


नाशिक : ३४ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना दिलासा 


मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका; 'उद्धवा अजब तुझे सरकार'


सीबीआयकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सहकाऱ्यांवर ४ नवीन खटले दाखल


पुणे : धानोरीमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्‍या 


'गंगूबाई काठियावाडी'च्‍या दबंगगिरीचे आव्‍हान चुलबुल्‍या आलियास पेलणार का?


मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाथरीकर मुंबईत दाखल