ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा बुक्‍का

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


पर्थ : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करीत नाबाद विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले 107 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. पावसामुळे पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव टळला होता व सामना रद्द झाला होता. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार फटकेबाजी केली. पाकिस्तानचा हा सलग सातवा ट्वेंटी-20 तील पराभव आहे. 

पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीचे सत्र तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यातही कायम राहिले. केन रिचर्डसन,  मिचेल स्टार्क आणि सीन अबॉट यांच्या भेदक मार्‍यानं पाकिस्तानच्या फलंदाजाला हतबल केले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा इफ्तिकार अहमदने चिवट खेळ करताना संघाला शंभरी पार पल्ला गाठून दिला. पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत केवळ 8 बाद 106 धावांच करता आल्या. बाबर आझम (6), मोहम्मद रिझवान (0) या दोघांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कने पाकला मोठा धक्‍का दिला. त्यानंतर अबॉट व रिचर्डसन यांनी पाकच्या अन्य फलंदाजांना गुंडाळले. इफ्तिकारने 37 चेंडूंत 45 धावांची संयमी खेळी करताना संघाला 106 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिचर्डसनने 18 धावांत 3 विकेटस् घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने खणखणीत षटकार मारून डावाची सुरुवात केली. त्याला कर्णधार अ‍ॅरोन फिंचनेही दोन चौकार लगावून साथ दिली; पण दुसर्‍याच षटकात वॉर्नरला बाद करण्याची सोपी संधी पाकच्या इमाम-उल-हकने गमावली. वॉर्नरने टोलावलेला चेंडू इमामने सुरेखपणे अडवला. मात्र, त्याला वॉर्नरला धावबाद करता आले नाही. त्यानंतर वॉर्नर आणि फिंचने तुफानी फटकेबाजी केली. फिंचने 36 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 52 धावा चोपल्या. तर, वॉर्नरने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 48 धावा केल्या.

कोल्हापूर : नवे ४ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह


काल इटलीला, आज स्पेनला मागे टाकले; भारतात कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ सुरुच!


धुळ्यात आणखी २० रुग्णांची भर


पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)


भाजप नेते कपिल मिश्रांच्या भडकावू भाषणांमुळे दिल्ली हिंसाचाराला प्रोत्साहान : मार्क झुकेरबर्ग


जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर


'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'


भारतीय हद्दीत घुसखोरी; चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चा निष्फळ


रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'


औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ