रोनाल्डोचा ज्युनिअर आशियाई विक्रम

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:42PM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय खेळाडू रोनाल्डो लेतोनजामने ट्रॅक आशिया सायकलिंग स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी जोरदार कामगिरी करून पुरुषांच्या ज्युनिअर 200 मीटर टाईम ट्रायल स्पर्धेत आशियाई विक्रमाची नोंद केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्णपदक जिंकणार्‍या रोनाल्डोने क्वालिफाईंग फेरीत 10.065 सेकंद वेळेसह विक्रम रचला. जुना विक्रम चीनच्या लियु कीच्या नावे असून, त्याने 2018 मध्ये 10.149 सेकंद वेळ नोंदवली होती.

विक्रमाची नोंद केल्यानंतर ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन रोनाल्डो म्हणाला की, माझे लक्ष्य फायनलमध्ये पात्रता मिळवण्याकडे होते. मात्र, मी जेव्हा गुणफलक बघितला तेव्हा स्वतःच  हैराण झालो. पदकतालिकेत आघाडीवर असणार्‍या भारताच्या खात्यात दुसर्‍या दिवशी चार पदकांची भर पडली.

वेंकप्पा शिवा के याने पुरुषांच्या ज्युनिअर तीन किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. पुरुष एलिट चार किलोमीटर स्पर्धेत पूनम चंदने रौप्यपदकाची कमाई केली. एलिट महिला गटात तीन किलोमीटर स्पर्धेत भारताने दोन पदके मिळवली. एलांगबम देवी व इरूनंगबाम देवी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले.
 जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड


बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब


'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन 


नागराज मंजुळेच्या 'झुंड'ची झलक पाहाच 


'विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांनी दबाव टाकू नये'


इचलकरंजी प्रेस क्लब आणि डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन कार्यशाळा संपन्न


'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'