Tue, Oct 24, 2017 16:51होमपेज › Sports › आशिष नेहराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

आशिष नेहराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

Published On: Oct 12 2017 2:20PM | Last Updated: Oct 12 2017 3:00PM

बुकमार्क करा

नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणारा ट्‌वेंटी-२० सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल. 

हैदराबादमध्येआज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, "घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही! निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.'' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 

नेहराने भारताकडून १७ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. २००३ साली इग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने २३ धावांत ६ बळी घेतले होते, त्याची ही खेळी सर्व भारतीयांसाठी यादगार होती.

१९९९ साली त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७, कसोटीत ४४ तर टी-२० मध्ये ३४ विकेट त्याने घेतल्या आहेत.