हिमा दासला आणखी एक सुवर्णपदक

Published On: Aug 19 2019 1:29AM | Last Updated: Aug 18 2019 10:16PM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचे अव्वल धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनस याने चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या अ‍ॅथलेटिकी मिटीनेक स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदके पटकावली. 300 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी ही पदके मिळवली. दोन जुलैपासून हिमाचे युरोपियन स्पर्धेतील हे सहावे सुवर्णपदक आहे.

शनिवारी शर्यत जिंकल्यानंतर हिमाने ट्विटरवरून ही माहिती दिली. पुरुष गटात अनसने 32.41 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला अनस सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोहा येथे होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 400 मीटर शर्यतीत यापूर्वीच पात्र ठरला आहे. परंतु, हिमा दासला अजून या स्पर्धेची पात्रता मिळालेली नाही.