Sat, May 30, 2020 01:52होमपेज › Sports › रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती

रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती

Last Updated: Feb 27 2020 2:43AM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

पाच वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी रशियन महिला टेनिसपटू मारिया शारापोव्हाने टेनिसमधून निवृत्त घेतली आहे. बुधवारी तिने आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली. 

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, शारापोव्हा यांनी व्होग आणि व्हॅनिटी फेअरमधील लेखात लिहिले आहे, "माझे शरीर अडथळे बनले होते."

खांद्याच्या दुखापतीमुळे शारापोव्हा झगडत होती. २००४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिने विम्बल्डन म्हणून पहिले ग्रँड स्लॅम जिंकले होते. तर २०१२ मध्ये फ्रेंच ओपन जिंकून टेनिस करियरच्या चार प्रमुख स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम पूर्ण केला. 

२००४ मध्ये शारापोव्हाने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असणा-या सेरेना विलियम्स वर मात करून विम्बल्डनवर कब्जा केला होता. २०१२ नंतर तिने २०१४ मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. शारापोव्हा २००६ मध्ये अमेरिकन ओपन आणि २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरली होती. 

२०१६ मध्ये शारापोव्हाला डोपिंगसाठी १५ महिन्यांसाठी बंदी घातली होती. एप्रिल २०१७ च्या एप्रिल महिन्यात तिने पुनरागमन केले होते. मात्र, त्यानंर ती टेनिस कोर्टावर काही खास प्रदर्शन करू शकली नाही.