Tue, Nov 19, 2019 14:13होमपेज › Soneri › जागतिक कोड दिन: लोकांच्‍या द्वेषावर मात करुन 'ती' बनली टॉप मॉडेल 

जागतिक कोड दिन: लोकांच्‍या द्वेषावर मात करुन 'ती' बनली टॉप मॉडेल(pic) 

Published On: Jun 25 2019 3:16PM | Last Updated: Jun 25 2019 3:01PM
कोड याविषयी जनमानसात अनेक शंका असतात. या विकाराविषयी नीटशी माहिती नसते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोड संसर्गजन्य नाहीत. रंगपेशी हळूहळू अकार्यक्षम होऊन शेवटी नाहीशा होतात. त्यामुळे शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात. परंतु याबाबत समाजात अनेक गैरसमय आणि भीती आहे. कोड या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २५  जून हा दिवस ‘व्हिटिलिगो’ अर्थात जागतिक कोड दिन  म्‍हणून घोषित केला आहे. यानिमित्त जाणून घेऊयात अशाच एका कॅनेडियन मॉडेलचा प्रेरणादायी प्रवास..

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

जगात असे बरेच लोक आहेत ज्‍यांनी त्‍यांच्‍या कमकुवतपणाच स्‍व:ताची ताकद बनवली आहे. आज अशाच एका सर्वसामान्‍य मुलीचा म्‍हणजे विनी हार्लो या कॅनेडियन मॉडेलचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहे.  शरीरावर पांढरे डाग असल्‍याने लोक विनी हार्लो हिची चेष्‍ठा,  द्वेष करायचे. तिला झेब्रा  या नावाने बोलवत होते.  आज हेच डाग तिच्‍या संघर्षाचे हत्‍यार बनले. आज विनी हार्लो अमेरिकेतील टॉप मॉडेल आहे.  

dinsta

विनी हार्लोला ‘व्हिटिलिगो’ हा त्‍वचेशी संबंधी आजार म्‍हणजे पांढरा कोड होता. यामुळे विनीच्‍या शरीरावर काही पांढरे डाग होते. विनीने या आजाराने न हरता त्‍यावर मात करायचे ठरवले. अमेरिकेतील टॉप मॉडेल म्‍हणून  विनीने नाव कमावले आहे. 

dinsta

'America's Next Top Model ' या शोमध्‍ये विनीने भाग घेतला व सिद्ध केले डाग अच्‍छे होते हे. विनीने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, लहान मुले तिला गाय म्‍हणून हसत असत व तिची चेष्‍ठा करत होते. तिला पांढर्‍या डागावरुन लोकांनी खूप चिढवले. तसेच तिने पुढे सांगितले की, कॉल सेंटरमध्‍ये काम करत असताना एका संगीत अल्‍बममध्‍ये काम करण्‍याचे ऑफर आली. या ऑफरने विनीचे आयुष्‍य बदलून गेले व ती अमेरिकेतील टॉप मॉडेल बनली. 

dinsta

विनीचा सर्वसामान्‍य मुलगी ते टॉप मॉडेलपर्यंत प्रवास प्रत्‍येकासाठी प्रेरणादायी असाच आहे. विनीनी या सगळ्‍यावर आत्‍मविश्‍वाने मात केली. पांढर्‍या डागाकडे कमी  म्‍हणून न पाहता त्‍याल्‍याच हत्‍यार बनवले. शेवटी काय रंग, रुप याहीपेक्षा मनाचे सौंदर्य महत्‍वाचे असते. शेवटी एकच म्‍हणावे वाटते 'डाग अच्‍छे होते है'.

dinsta