Sun, Sep 22, 2019 21:57होमपेज › Soneri › विवेक म्‍हणतो, आता पैसा वसुल कसा करू? 

विवेक म्‍हणतो, आता पैसा वसुल कसा करू? 

Published On: May 24 2019 3:32PM | Last Updated: May 24 2019 3:32PM
मोठ्‍या पडद्‍यावरही 'मोदी-मोदी', पैसा वसुल कसा करू?  

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय मीमवरून वादात सापडल्‍यानंतर आता आज त्‍याचा एक चित्रपट रिलीज झाला आहे. मोठ्‍या पडद्‍यावरही 'मोदी-मोदी' दिसत आहे. विवेक ओबेरॉयचा पीएम नरेंद्र मोदी बायोपिक आज मोठ्‍या पडद्‍यावर रिलीज झाला आहे. 

लोकसभेच्‍या निवडणुकीमुळे त्‍याच्‍या बायोपिकची रिलीज डेट अनेक दिवसांपासून टळली होती. निवडणुकीमुळे या बायोकिच्‍या प्रदर्शनावर बंदी आणली होती. आता २४ मे ला हा चित्रपट रिलीज झालाय. 
विवेक ओबेरॉयने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदी बायोपिकशी संबंधित त्‍याने अनेक गोष्‍टी उलगडल्‍या. विवेक म्‍हणाला, पैसा वसुल कसा करायचा? 

विवेकने सांगितले की, चित्रपट रिलीज होण्‍याच्‍या काही तासांपूर्वी त्‍यांच्‍या संपूर्ण टीमला समजलं की, चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्‍यात आले आहे. त्‍यानंतर त्‍यांच्‍या टीमची खूपच वाईट परिस्‍थिती झाली होती. जगातील सर्वात वाईट अनुभव मला त्‍यावेळी आला. येथे संपूर्ण चित्रपटाचा ॲन्‍टी क्लायमॅक्स होता. चित्रपटाचे प्रिंट पाठवण्‍यात आले होते. ११ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार होता. १० एप्रिलच्‍या रात्री आम्‍हाला निवडणूक आयोगाकडून नोटिस मिळाली.' 

विवेक ओबेरॉयने म्‍हटले- 'या चित्रपटासाठी तरुणांनी, टीमने खूप मेहनत घेतली होती. या वृत्तानंतर सर्वांची निराशा झाली.

आम्‍ही कोर्टात गेलो. त्‍या लोकांनी अगदी शेवटपर्यंत आमच्‍यावर हल्‍ला केला. आमचा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. आम्‍ही सर्व खर्च उचलला. आम्‍ही लोकांनी थिएटर्स बुक केले होते आणि प्रमोशनसाठी पैसेदेगील खर्च केले होते. कोटी रुपये खर्च केले. आता आम्‍ही आमचे पैसे वसूल करण्‍यासाठी कोठे जावे?'