Thu, Sep 19, 2019 03:30



होमपेज › Soneri › विवेककडून सलमानच्‍या चित्रपटाचे चक्‍क प्रमोशन

विवेककडून सलमानच्‍या चित्रपटाचे चक्‍क प्रमोशन

Published On: May 24 2019 4:04PM | Last Updated: May 24 2019 4:04PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणूक २०१९ मध्‍ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप प्रचंड मतांनी निवडून आला. आज पीएम नरेंद्र मोदी बायोपिकही रिलीज झाले आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' यांची भूमिका विवेकने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी, विवेक ऐश्‍वर्याच्‍या एक्‍झिट पोल मीमवरून वादात सापडला होता. यानंतर त्‍याला राष्‍ट्रीय महिला आयोगाने नोटिस पाठवली होती. यानंतर विवेकने ट्‍विट डिलीट करत माफी मागितली होती. आता विवेकने आणखी एक ट्‍विट केले आहे. 

विवेकने महाआघाडीची चेष्‍टा केली आहे. आपल्‍या ट्विटर अकाउंटवर विवेक ओबेरॉयने जे मीम ट्‍विट केले आहे, ते सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. 

विवेकने जो फोटो शेअर केला आहे, त्‍यामध्‍ये मायावती, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, अजीत सिंह, सीताराम येचुरी आणि इतर नेते दिसत आहेत. ते एकत्र मिळून हात उंचावताना दिसत आहेत. तसेच या फोटोमध्‍ये मोदी नावाचेडिटर्जेट पावडर दिसत आहे. आणि फोटोवर एक पांढर्‍या रंगाच्‍या पट्‍ट्‍यावर टॅगलाईन येते की, चौंक गये? 

विवेक ओबेरॉयने आपल्‍या ट्‍विटमध्‍ये लिहिले आहे, 'सर्व नेते जे नरेंद्र मोदींचा द्‍वेष करायला एकत्र आले, त्‍यांना विनंती आहे की, आपला अधिक वेळ 'भारत'ला प्रेम करण्‍यात घालवावा. मोदींचा द्‍वेष करण्‍यात नाही. 

या ट्‍विटमध्‍ये विवेक 'भारत'वर प्रेम करण्‍यास सांगतो. खरंतलरं, भारत हा सलमान खानचा आगामी चित्रपट आहे. त्‍यामुळे अप्रत्‍यक्षरित्‍या विवेकने भारतचे प्रमोशन केले आहे.