Tue, Aug 20, 2019 15:30होमपेज › Soneri › १६ वर्षांपूर्वीचा वाद, विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल 

१६ वर्षांपूर्वीचा वाद, विवेकचा सलमानला सवाल 

Published On: Apr 18 2019 4:09PM | Last Updated: Apr 18 2019 4:09PM

‘माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का?’मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता विवेक ओबेरॉयचा आगामी चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ सध्‍या चर्चेत आहे. सध्‍या या चित्रपटाचे प्रदर्शन निवडणुकीच्‍या काळात रोखण्‍यात आले आहे. या चित्रपटाच्‍या प्रमोशतानिमित्त विवेक ओबेरॉय मुलाखती देत आहे. त्याने दिलेल्या एका मुलाखतीनंतर पुन्‍हा विवेक आणि सलमानची चर्चा होत आहे. १६ वर्षांपूर्वी झालेल्या सलमानसोबतचा विवेकचा वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे.

विवेकला मुलाखतीत विचारण्‍यात आले की, जर तुला सलमानला प्रश्‍न विचारण्याची संधी दिली तर तू काय विचारशील? यावर विवेक म्हणाला, ‘तू माफ करण्यावर विश्वास करतोस का?’ असा प्रश्‍न विचारेन. विवेकच्या या प्रश्‍नामुळे पुन्हा एकदा सलमान आणि विवेकमध्‍ये १६ वर्षांपूर्वी झालेला वाद उफाळून आला आहे.

असे म्‍हटले जाते की, २००३ मध्‍ये सलमान आणि ऐश्वर्या रायच्‍या नात्‍यात दुरावा आला होता. त्‍यावेळी विवेक ओबरॉय आणि ॲशची जवळीक निर्माण झाली. याचदरम्‍यान, विवेकने २००३ मध्ये पत्रकार परिषद घेत सलमानवर काही आरोप केले होते. त्यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली. पत्रकार परिषदेत विवेकने म्‍हटले होते-'सलमानने मला जवळजवळ ४१ वेळा फोन केले आणि धमकी दिली. हे पाहा मिस्ड कॉल्स...सलमानने मला मारहाण करण्‍याची आणि जीवे मारण्‍याची धमकी दिली.'

ऐश्वर्या आपल्‍या लाईफमध्‍ये पुढे गेली. मात्र, विवेकच्‍या करिअरला आणि स्टारडमला एकदम ब्रेक लागला. सलमान, ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्‍यात अधिक नुकसान झाले असेल तर ते विवेकचे. 

आता यावर सलमानकडून मात्र, काही प्रतिक्रिया आलेल्‍या नाहीत. 

विवेकचा आगामी चित्रपट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक हा विवेक ओबेरॉयचा आगामी प्रोजक्‍ट आहे. निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्‍लंघन होऊ नये, यासाठी या बायोफिकचे प्रदर्शन निवडणूक काळात रोखण्‍यात आले आहे.