Sun, Jul 12, 2020 21:39होमपेज › Soneri › विणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट

विणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट

Published On: Jul 22 2019 3:24PM | Last Updated: Jul 22 2019 3:24PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला आता मोठी पसंती मिळू लागली आहे. १०० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे नुकतेच ५५ दिवस पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस खेळाडूंमध्ये चुरसही वाढताना पहायला मिळते आहे. असे असले तरी, या खेळातील एका स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा पक्की करून ठेवली आहे. स्पष्टवक्तेपणा आणि सर्वसमावेशक या स्वभावामुळे त्या व्यक्तीला सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. ती व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री वीणा जगताप! कारण, वीणाचे सोशल नेटवर्किंग अकाउंट पाहिले असता तिच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. 

वीणाच्या इन्स्टाग्रामवर सध्या २०० हजार फॉलोअर्सचा आकडा झळकत असल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी ती कीती खास आहे हे समजून येते. तिच्या याच चाहत्यांमुळे ती आतापर्यंत अनेकवेळा नॉमिनेशन फेरीत जाऊनदेखील सुरक्षित झाली आहे. बिग बॉसच्या घरातील तिचे वास्तव्य आणि तिचा खेळ लोकांना आवडत असल्याचे हे प्रमाण आहे. शिवाय यंदाच्या 'विकेंड चा डाव'मध्ये होस्ट महेश मांजरेकर यांनी तिला 'फेअर परफॉर्मन्स ऑफ द वीक' ठरवले आहे. त्यामुळे वीणा 'बिग बॉस मराठी सीजन-२'च्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.