Mon, May 25, 2020 19:34होमपेज › Soneri › 'रामायण'मधील 'सुग्रीव' श्याम सुंदर कालवश

'रामायण'मधील 'सुग्रीव' श्याम सुंदर कालवश

Last Updated: Apr 10 2020 2:06PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

रामायण या लोकप्रिय मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे अभिनेते श्याम सुंदर यांचे निधन झाले. श्याम सुंदर यांनी रामायणमध्ये सुग्रीवची भूमिका साकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ते कॅन्सरने पीडित होते. 

रामायणमध्ये प्रभू राम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी ट्विट करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे म्हटले आहे. अरुण गोविल यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "श्याम सुंदरजी यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारली होती. एक सज्जन व्यक्ती. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो." 

रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनीही ट्विट करून म्हटले आहे-"श्याम सुंदर यांच्या आत्म्याला शांती मिळो. आमचे सहकलाकार ज्यांनी रामायणमध्ये बाली आणि सुग्रीव यांची भूमिका साकारली होती, त्यांचे अचानक निधन झाले, हे ऐकून दु:ख झालं. ईश्वर त्यांच्या या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.