होमपेज › Soneri › 'मी थकले आहे, आता आणखी सहन करू शकत नाही', प्रेक्षाच्या सुसाईड नोटमध्ये खुलासा 

'मी थकले आहे, आता आणखी सहन करू शकत नाही', प्रेक्षाच्या सुसाईड नोटमध्ये खुलासा 

Last Updated: May 28 2020 11:08AM

अभिनेत्री प्रेक्षा मेहता नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहताने इंदुरमध्ये आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याआधी तिने सोशल मीडियावर अखेरचे पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामध्ये तिने म्हटले होते, 'सर्वात वाईट म्हणजे जेव्हा आपली स्वप्ने मरतात.' तिने आत्महत्यापूर्वी एका पानाची सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये तिने आत्महत्या का केली, याबद्दल लिहिले होते. 

वाचा - 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना प्रेक्षाच्या खोलीतून एक पान सुसाईड नोट मिळाली आहे. हीरा नगर पोलिस ठाण्याच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, प्रेक्षाच्या खोलीतून एक सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये तिने लिहिलंय की, मी खूप प्रयत्न केला यावेळी पॉझिटिव्ह राहण्याचा. परंतु, राहू शकले नाही. एका वृत्तसंस्थेशी बोलताना वरीष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की, तपास करताना माहिती झाली आहे की, प्रेक्षा डिप्रेशनमध्ये होती. आम्ही पुढे तापास करत आहोत. तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, माझ्या तुटलेल्या स्वप्नांनी माझा आत्मविश्वास तोडला. मी मेलेल्या स्वप्नांसोबत जगू शकत नाही. या निगेटिव्हिटीसोबत जगणं खूप मुश्किल आहे. मगील एक वर्षांपासून मी खूप प्रयत्न केला. आता मी थकले आहे. 

प्रेक्षाच्या चुलत बहिणीच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षाने खूप मेहनत केली आहे. तिला आपल्या स्वप्नासोबत जगायचं होतं. परंतु, तिच्या अपेक्षाही खूप होत्या. बालपणापासून ती हसतमुख आणि बोलणाऱ्यांपैकी होती. परंतु, ती काही दिवसांपासून शांत होती. सोमवारी ती जिन्यावर एकटी बसली होती. कुटुंबीयांसोबत कार्ड्स खेळण्यासाठीही आली नव्हती. तिच्या आईने तिला विचारलं की, तू ठीक आहेस का? तेव्हा प्रेक्षाने आपण ठीक असल्याचे म्हटले होते.