Fri, Dec 13, 2019 19:37होमपेज › Soneri › आदित्य ठाकरेमुळे टायगर-दिशाचा ब्रेकअप?  

आदित्य ठाकरेमुळे टायगर-दिशाचा ब्रेकअप?  

Published On: Jun 25 2019 1:18PM | Last Updated: Jun 25 2019 1:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची जोरदार चर्चा सध्या होत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या दोघांनीही आपले रिलेशनशीप कधीही उघडपणे सांगितले नाही. परंतु, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने टायगरसोबत दिसल्याने चर्चेत राहिली. त्यामुळे टायगर आणि दिशाच्या अफेअरची चर्चा रंगली. 

आता या क्यूट कपलविषयी एक नवे अपडेट समोर आले आहे. दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, टायगर आणि दिशा आता वेगळे होत आहेत. 

वाचा : आदित्‍य ठाकरे-दिशामध्‍ये शिजतयं तरी काय?

काय चाललयं काय? आदित्‍य ठाकरे-दिशा डेटवर!

आदित्य ठाकरे-दिशा पटानी पुन्हा डिनर डेटवर!

दोन्ही स्टार्सशी संबंधित एका सूत्राने या इंग्रजी वेबसाईटला सांगितले की, गेल्या काही दिवसांत टायगर आणि दिशाच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यामुळे दोघे  वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. दोघांचे फ्रेंड सर्कल कॉमन आहे. त्यामुळे दोघांची भेट होत राहते. परंतु, आता दोघे रोमँटिक नात्यात नाहीत. 

दिशाच्या प्रश्नावर लाजले आदित्य ठाकरे (Video)

काही दिवसांपूर्वी, टायगर आणि दिशा एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले होते. टायगरने दिशाला फॅन्सच्या गराड्यातून बाहेर काढले होते. याचे फोटोज व्हायरल झाले होते.

आदित्‍य-दिशा पहिल्‍यांदाच एकत्र 

आदित्‍य-दिशा पहिल्‍यांदाच एकत्र स्‍पॉट झाल्‍यानंतर चर्चांना उधाण आले होते. दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्‍ये लंचसाठी गेले होते. त्‍यानंतर, काही दिवसांनी पुन्‍हा दोघे एकत्र स्‍पॉट झाले. यावेळी दिशा मात्र सोशल मीडियावरून ट्रोल झाली होती. टायगर कहा है? अशा कॉमेंट्‍स नेटकर्‍यांनी केल्‍या होत्‍या. मात्र, दिशाला त्‍याचा काही फरक पडला नाही. दिशाने यावर सडेतोड उत्तर दिले होते. मी मित्रोसोबत लंच वा डिनरला जाऊ शकत नाही का? असे उत्तर तिने दिले होते. 

आता या सर्व घडामोडींनंतर, आदित्य ठाकरे यांच्यामुळे टायगर-दिशाचा ब्रेकअप झाला? असा सवाल उपस्थित होत आहे.