Tue, Nov 19, 2019 10:55होमपेज › Soneri › साराचा हा व्‍हिडिओ पाहून तुम्‍हालाही हसू येईल

साराचा 'हा' व्‍हिडिओ पाहून तुम्‍ही हसणारच!

Published On: Jun 20 2019 2:08PM | Last Updated: Jun 20 2019 2:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'केदारनाथ' आणि 'सिंबा' या सुपरहिट चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. या व्हिडिओत सारा आपल्या लहानपणी किती खोडकर आहे हे दिसून येत आहे. 

या व्हिडिओत सैफ अली खान (वडिल)सोबत सारा खेळत आहे. हा व्हिडिओ साराच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. या व्हिडिओला साराच्या चाहत्यांनी दाद दिली आहे. तर हा खोडकर व्हिडिओ सर्वाना खूपच आवडला आहे.         

या व्हिडिओवरून सारा आपल्या वडिलांसोबत खूपच क्लोज असल्याचे दिसत आहे. तर कॉफी विथ करण शोमध्ये साराने आपल्या बालपणीचा आठवणी शेअर केल्या होत्या. तसेच माझे वडील माझे खूप चांगले मित्र असल्याचेही तिने सांगितले होते. 

यासोबत साराच्या या व्हिडिओवर एका फॅन्सने कॉमेंटस् करत लिहिले आहे की, 'अगदी लहानपणी सारा खूपच क्यूट दिसत होती. तर ती आता ही तितकीच सुंदर दिसते. तर आम्ही या  वस्तुस्थितीशी पूर्णपणे सहमत आहोत.' 

याशिवाय साराने फादर्स डेनिमित्ताने सैफ अली खानसोबत एक फोटो शेअर केला होता. तसेच या फोटोसोबत साराने एक कॅप्शनही लिहिली आहे की, 'हॅप्‍पी फादर्स डे अब्बा. नेहमी माझ्याबरोबर राहा आणि सुट्टीत माझा सर्वात चांगला पार्टनर बना, मला शिकवल्याबद्दल, पहिला पाऊस आणि हिमवर्षाव दाखवण्याबद्दल मी आभारी आहे. तसेच माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी तुम्हचे आभार मानते.'

याशिवाय सारा इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सारासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. 

तसेच सारा वरुण धवनसोबत कूली नंबर १च्या रिमेकमध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन करणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २०२० रोजी रिलीज होणार आहेत.  

(video : saraalikhan_daily, saraalikhan95 instagram वरून साभार)