Tue, Oct 24, 2017 16:50होमपेज › Soneri › कल्पनेतील खरे आयुष्य जगणारी स्पृहा

कल्पनेतील खरे आयुष्य जगणारी स्पृहा

Published On: Oct 13 2017 12:17PM | Last Updated: Oct 13 2017 12:10PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

माझी स्वप्नं, दे ना मला. पण काय आहे, मला ती पकडायची आहेत. माझ्या, स्वतःच्या, या दोन हातांत, ते तेवढे मोकळे करशील ? असा लोभस प्रश्न विचारणारी अन कल्पनेतील खरे आयुष्य जगणाऱ्या स्पृहा जोशीचा आज वाढदिवस!  

स्पृहा अभिनय..कविता...गाणी लिहणे फक्त छंद म्हणून नाही तर त्याकडे एक उत्कृष्ट करिअर म्हणून पाहते. अभिनयात तर तिचा हातखंडा आहेच पण त्याचबरोबर ‘किती सांगायचय मला’, ‘बावरे हे प्रेम’, ‘साद ही प्रेमाची’ अशी मनाला भुलवणारी अन् कानावर पडताच जोडीदाराची आठवण करून देणारी गाणी ही स्पृहाने लिहिली आहेत. 

‘माय बाप’

स्पृहाने करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून २००४ मध्ये ‘माय बाप’ मधून केली होती.त्यानंतर बरीच वर्षे ती चित्रपटसृष्टीत दिसली नाही. २००९ मध्ये स्पृहाने ‘मोरया’ चित्रपटातून दमदार एंट्री केली. ‘सुर राहू दे’, ‘बायोस्कोप’, ‘पैसा-पैसा’, ‘मला काहीच प्रोब्लेम नाही’ यासारख्या दर्जेदार चित्रपटातही तिने काम केले. 

मालिकेतील स्पृहा

झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये स्पृहाने स्वत:च्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

कवी मनाची स्पृहा

स्पृहा एक कवयित्री देखील आहे. अभिनयाबरोबरच उत्कृष्ट काव्य, गाणी लिहीण्याचे कामही स्पृहा आवडीने करते. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्रीचे पात्र तिने साकारले होते. 

रंगमंचावरील उत्कृष्ठ अभिनेत्री स्पृहा 

‘अनन्या’, ‘ग म भ न’,‘युग्मक’ या सारख्या एकांकिका आणि ‘नेव्हर माइंड’, ‘पेइंग घोस्ट’, ‘बायोस्कोप’, ‘लहानपण देगा देवा’ यासारख्या नाटकांमध्ये सहभाग घेऊन स्पृहाने अभिनयाची वेगळीच उंची गाठली आहे. 

स्पृहाने चित्रपटांमध्ये काम करताना टी.व्ही मालिकांमध्येही अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे. मराठी मालिकांमधून स्पृहा घराघरात पोहोचली आहे. अग्निहोत्र, आभाळमाया आणि विशेषत: उंच माझा झोका या मालिकेतून रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका कौतुकास पात्र ठरली. 

एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बाँबे लॉयर्स, सत्यमेव जयते, स्ट्रगलर्स, प्रेम हे यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.