Wed, Jan 22, 2020 02:27



होमपेज › Soneri › ‘हिरकणी’मध्ये अनोखे ‘शिवराज्याभिषेक गीत’

‘हिरकणी’मध्ये अनोखे ‘शिवराज्याभिषेक गीत’

Published On: Sep 11 2019 4:45PM | Last Updated: Sep 11 2019 3:59PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण.. ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात. ते ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग, सुहास जोशी आणि संगीतकार राहुल रानडे.

कविभूषण, संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर अमितराज यांनी संगीत दिले आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दिपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी आणि संतोष बोटे यांनी हे गाणे गायले आहे.

राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तर सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. ‘हिरकणी’ सिनेमा २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.