Tue, Jul 14, 2020 06:33होमपेज › Soneri › सनी दिसणार 'या' दाक्षिणात्‍य कॉमेडियनसोबत 

सनी दिसणार 'या' दाक्षिणात्‍य कॉमेडियनसोबत 

Published On: Jun 13 2019 5:25PM | Last Updated: Jun 13 2019 5:36PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडपटानंतर आता दाक्षिणात्‍य चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. याआधी सनीने तमिळ सिनेइंडस्‍ट्रीत पदार्पण केले होते. तिचा २०१४ मध्‍ये 'Vadacurry' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात तिचा स्‍पेशल ॲपियरन्‍स होता. त्‍याचबरोबर, सनी लिओनी मल्‍याळम चित्रपटांचे सुपरस्टार माम्मूटीसोबत दिसणार आहे. सनी आणि माम्मूटी 'मधुरा राजा' या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. आता ती दाक्षिणात्‍य कॉमेडियन अभिनेता ब्रह्मानंदमसोबत 'कोकाकोला' चित्रपटात दिसणार आहे. 

'कोकाकोला' या चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाल आणि परमदीप संधू यांनी तर दिग्दर्शन प्रसाद टटिकेनी यांनी केले आहे.  तसेच सनी आणि मंदाना करीमी काहीच दिवसांपूर्वी एका हॉरर कॉमेडी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

dinsta

'कोकाकोला' या चित्रपटात दक्षिण भारतीय तडका पाहायला मिळणार आहे. ११०० हून अधिक चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता ब्रह्मानंदम आणि १७०हून अधिक दक्षिणात्य चित्रपटात काम करणारे अभिनेता सुनील वर्मा 'कोकाकोला' मध्‍ये दिसणार आहेत. 

dinsta

ब्रह्मानंदमची काही महिन्यांपूर्वी हार्ट सर्जरी झाली आहे. सर्जरीनंतर आता तो बरा झाला असून नव्‍याने पुन्हा आपल्या कामावर रूजू होणार आहे. 

dinsta

तर सुनील आणि ब्रह्मानंदम दोघेजणांनी अनेक दक्षिणात्य चित्रपटात एकत्र काम केले आहे. तर दोघांचा एस. एस. राजमौली दिग्दर्शित 'मगधीरा' हा चित्रपट गाजला आहे. 

dinsta

निर्माता महेंद्र धारीवाल यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले, 'आमचे दिग्दर्शक प्रसाद यांनी अनेक दक्षिणात्य भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी या दोन्ही अभिनेत्यांना चित्रपटात घेण्याचा सल्ला दिला. या दोन कलाकारांना या चित्रपटात घेण्यात आम्हाला खूप आनंद झाला आहे. या दोन्ही कॉमेडीयन कलाकार आहेत आणि या चित्रपटात या दोघांची एन्ट्री झाल्याने या चित्रपटांचे महत्त्व वाढले आहे.' 

dinsta

dinsta