Mon, Jul 13, 2020 22:59होमपेज › Soneri › सलमानमुळे बदलली अक्षयच्या सिनेमाची डेट

इंशाअल्‍लाह-सूर्यवंशीची टक्‍कर, सलमानमुळे बदलली अक्षयच्या सिनेमाची डेट

Published On: Jun 12 2019 6:42PM | Last Updated: Jun 12 2019 6:46PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमारचा चित्रपट २०२० ला ईदच्या मुहूर्तावर एकाच दिवशी रिलीज होणार होते. परंतु, आता हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार नाहीत. कारण अक्षयच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्‍यात आली आहे. 'सांवरिया' या चित्रपटानंतर सलमान १२ वर्षांनी भन्साळींसोबत नवा चित्रपट घेवून येत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्ट दिसणार आहे.  

सलमान खान आणि 'इंशाअल्‍लाह' चित्रपटाच्‍या निर्मात्यांनी २०२० ला ईदच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज डेट ठरवली होती. तर सलमानचा एक चित्रपट ईदच्या मुहूर्तावर बॉक्‍स ऑफिसवर रिलीज होतोच. त्‍याचबरोबर, त्‍यावेळी चित्रपटाची कमाईही प्रचंड असते. त्‍यामुळे सलमानने अक्षयच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज डेट बदल्याचा प्रयत्न करत होता. 

आता अथक प्रयत्नानंतर 'सूर्यवंशी'चे निर्माता रोहित शेट्टीने हे मान्य केले आहे. यावर सलमानने सोशल मीडियावरून त्याचे आभार मानले आहेत. या ट्‍विटसोबतही सलमानने एक कॅप्शनही लिहिली आहे की, 'मी नेहमीच विचार करतो की, तू माझा धाकटा भाऊ आहेस, पण आता ते सिद्ध झाले आहे.'   

'सूर्यवंशी' हा चित्रपट 'सिंघम' या वेबसीरीजचा चौथा चित्रपट असून २७ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कॅटरीना कैफची मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर चित्रपटात अक्षय पोलिसांची भूमिका साकारणार आहे. 'सूर्यवंशी' हा चित्रपटाचे करण जोहर निर्मिती करत आहेत.  

 ईदला सलमानचा जलवा

सलमान खानचे ईदच्या मुहूर्तावर जे चित्रपट रिलीज झाले त्यानी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. यामध्ये 'प्रेम रतन धन पायो'ची कमाई ४०.३, 'सुल्‍तान'ची कमाई ३६. ५, 'टायगर जिंदा है' ची कमाई ३४. १, 'एक था टायगर'ची कमाई ३२.९२,  'रेस ३'ची कमाई २९.१ आणि सध्याचा 'भारत'ची कमाई ४२.३० कोटी रूपयांची कमाई केली आहे. 
(photo : taran adarsh, salman khan twitt वरून साभार)