Fri, Jun 05, 2020 21:40होमपेज › Soneri › पाकमध्ये लग्नात परफॉर्म करणं पडलं महागात, मिका सिंहवर बंदी 

पाकमध्ये लग्नात परफॉर्म करणं पडलं महागात, मिका सिंहवर बंदी 

Published On: Aug 14 2019 4:09PM | Last Updated: Aug 14 2019 4:09PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड गायक मिका सिंहला पाकिस्तानमध्ये एका लग्नात परफॉर्म करणे महागात पडले आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने त्याच्यावर गाणे गाण्यास बंदी घातली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये एक परफॉर्मन्सचा होता. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर मिका सिंहवर जोरदार टिका होत आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने मिका सिंहवर गाणे गाण्यास बंदी घातली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. 

सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटले आहे, "मिकाचे मुव्ही प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाईन कंटेंट प्रोव्हायडरसोबत मिकाच्या सर्व कॉन्ट्रॅक्ट्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, असोसिएशनने मिकाचे सर्व चित्रपट, गाणी आणि एंटरटेनमेंट कंपनीसोबत काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

Image

सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) या गोष्टीकडे लक्ष ठेवेल की, इंडस्ट्रीमध्ये कोणीही मिका सिंहसोबत काम करणार नाही. जर असे कोणी करत असेल त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याला कोर्टात हजर व्हावे लागेल.'

त्यांनी म्हटले आहे की, "ज्यावेळी दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, त्यावेळी मिकाने देशापेक्षा पैशांना महत्त्व दिले. 

मागील काही दिवसांमध्ये मिका सिंहचा एक व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये माजी राष्ट्रपती जनरल (सेवानिवृत्त) परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये परफॉर्म करताना दिसला होता. त्यानंतर अनेक लोकांनी मिकाच्या परफॉर्मन्सवर नाराजी दर्शवली होती. नेटकऱ्यांनी मिकाला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात केले होते आणि चित्रपट इंडस्ट्रीला मिकावर बंदी घालण्याची मागणी केली होती.