Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Soneri › बिग बींच्‍या बर्थडेला श्वेताकडून खास गिफ्‍टची तयारी 

बिग बींच्‍या बर्थडेला श्वेताकडून खास गिफ्‍टची तयारी 

Published On: Sep 12 2018 3:16PM | Last Updated: Sep 12 2018 3:16PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आपल्‍या वडिलांना एक खास भेटवस्‍तू देणार आहे. बिग बींचा ११ ऑक्‍टोबरला वाढदिवस आहे. १० ऑक्‍टोबरला श्‍वेता तिची पहिली कादंबरी  ‘पॅराडाईज टॉवर्स’ लॉन्च करणार आहे. 

सूत्रांच्‍या  माहितीनुसार, श्वेताने या कादंबरीत मुंबईतल्‍या घरांची कथा सांगितली आहे. कादंबरत एका बिल्डिंगच्‍या आतलं आयुष्‍य, जीवनातले चढ-उतार, नात्‍यांमधला दुरावा आणि आनंदाची कहाणी सांगितलीय. 

एका मुलाखतीत श्वेताने म्‍हटलं होतं की, 'बालपणापासूनच तिला लिहिण्‍याचा छंद आहे.' श्वेता म्‍हणते की, तिचे आजोबा हरिवंश राय बच्चन तिच्‍यासाठी प्रेरणा होते. इतकेच नाही तर श्वेताने मुंबईच्‍या एका वृत्तपत्रातून लिहायला सुरूवात केली. ती एका वृत्तपत्रात कॉलम लिहित होती.

श्‍वेता म्‍हणाली, 'मी लेखक फॅमिलीतून आहे. बालपणी आम्‍हाला लिहिण्‍यास-वाचण्‍यास प्रोत्साहित केलं जात होतं.' 

श्‍वेता आतापर्यंत लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. काही दिवसांपूर्वी श्वेताने अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत पहिली जाहिरात केली आहे. 

फॅशन स्टोर लॉन्च
श्वेताने डिझायनर मोनिशा जयसिंह यांच्‍यासोबत मिळून फॅशन लेबल 'एमएक्सएस' लॉन्च केलं आहे. या औचित्‍याने बच्चन कुटुंबीय आणि अनेक दिग्‍गज मंडळी इव्‍हेंटला पोहोचले होते.