Thu, Jun 04, 2020 03:35होमपेज › Soneri › शाहरुखने असे काम केले की मोदींनीही केले कौतुक 

शाहरुखने असे काम केले की मोदींनीही केले कौतुक 

Published On: Apr 23 2019 6:22PM | Last Updated: Apr 23 2019 6:22PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

देशभरात लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्‍हणून सेलिब्रिटी सोशल मीडियावरून, टीव्‍हीवरून, जाहिरातीतून मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. आता शाहरुखनेही यामध्‍ये उडी घेतली आहे. सध्‍या शाहरुखचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल होताना दिसत आहे. विशेष म्‍हणजे, या गाण्‍याचे कौतुक खुद्‍द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. 

मतदारांमध्‍ये जागृती करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुखने रॅप सॉन्‍ग गायले आहे. त्‍याचा या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. 

शाहरुखने गायलेल्‍या गाण्‍याला तनिष्क बागची आणि अब्बी यांनी शब्दबद्ध केले आहे. १ मिनिटांच्‍या रॅप सॉन्‍गमधून शाहरुखने मतदान करण्याच्या अधिकाराचे महत्त्व सांगितले आहे. 

शेअर केलेल्‍या व्‍हिडिओला 'मतदान फक्त आपला हक्क नाही, तर ही आपली शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करा,' अशी कॅप्शन देण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओची स्तुती केली आहे. मोदींनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे....'उत्तम प्रयत्न.. देशातील नागरिक आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणारे लोक तुझ्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देतील आणि मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे.'

नागरिकांमध्‍ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोदी यांनीनी मार्चमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींना आवाहन केले होते. त्‍यांनी प्रत्‍येक स्‍टारना टॅग करून ट्‍विट केले होते.