Thu, May 28, 2020 16:55होमपेज › Soneri › शाहरुख-इमरानसोबत प्रियांकाचीही वेब सीरीजमध्ये एन्ट्री 

शाहरुख-इमरानसोबत प्रियांकाचीही वेब सीरीजमध्ये एन्ट्री 

Published On: Aug 22 2019 6:18PM | Last Updated: Aug 22 2019 7:09PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

नेटफ्लिक्सचा एक प्रोमो व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड किंग खान शाहरुख दिसत आहे. पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या वेब सीरीजमध्ये शाहरूख खान दिसणार आहे. या वेब सीरीजचे नाव 'बार्ड ऑफ ब्लड' असे आहे. सीरीजमध्ये इमरान हाश्मीचीही महत्त्वाची भूमिका आहे.   

नेटफ्लिक्सची 'बार्ड ऑफ ब्लड' ही वेब सीरीजची निर्मिती शाहरुख खान करणार असून २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ही वेब सिरीज ७ भागांत आहे. याची कथा लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

प्रियांका चोप्राचीही एन्ट्री  

बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर प्रियांका चोप्रा आता नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजमध्ये आपले नशीब आजमावण्यास सज्ज आहे. 'क्वाटिंको गर्ल' प्रियांका चोप्रा नेटफ्लिक्सची सुपरहीरो सीरिज, 'वी कॅन बी हीरोज (We Can Be Heroes)' मध्ये झळकणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे. स्पाय किड्सचे दिग्दर्शक रॉबर्ट रोड्रिगुएज ही सीरीज दिग्दर्शित करणार आहेत. याआधी प्रियांका 'बेवॉच'मध्ये 'द रॉक'सोबत दिसली होती.