मनावर रुंजी घालणारा शाहरूख!...

Last Updated: Nov 02 2019 9:09AM
Responsive image
शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस


छोट्‍या पडद्‍यावरून आपल्‍या करिअरची सुरुवात करणार्‍या शाहरुखला 'बॉलिवूडचा बादशाह' म्‍हणून ओळख निर्माण करायला बराच संघर्ष करावा लागला. आजदेखील लाखो-करोडो लोकांच्‍या मनावर रुंजी घालणारा तो शाहरूखच आहे. 

चित्रपट इंडस्‍ट्रीत 'किंग खान' अशी ओळख असलेल्‍या शाहरुखचा जन्‍म २ नोव्‍हेंबर १९६५ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍याचे वडिल टान्‍सपोर्ट व्‍यवसायाशी संबंधित होते. 

शाहरुखने जामिया मिलिया इस्‍लामिया विद्‍यापीठातून पदवी घेतली. 

१९९८ मध्‍ये शाहरुख खानने टीव्‍हीवरील 'फौजी' मालिकेतून करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्‍ये आपले स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो मुंबईत आला. अजीज मिर्झा यांनी शाहरुखला आपली मालिका सर्कसमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. त्‍याचवेळी हेमा मालिनी यांना त्‍यांचा पहिलाच दिग्‍दर्शित चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्‍हणून नव्‍या चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्‍यात दिव्‍या भारतीची प्रमुख भूमिका होती. 

शाहरुखला ज्‍यावेळी ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी आपल्‍या मित्रांच्‍या मदतीने या चित्रपटाच्‍या स्‍क्रिन टेस्‍टसाठी जाण्‍याचा शाहरुखने निर्णय घेतला. 

Image result for shahrukh khan hd

हेमा मालिनी यांना अखेर हिरो सापडला...

हेमा मालिनी यांना मात्र, 'त्‍या' अज्ञात नायकाबद्‍दल खात्री वाटत नव्‍हती. ठरवल्‍याप्रमाणे हेमा मालिनी हैदराबादचा कार्यक्रम आटोपून मुंबईला आल्‍या. सवयीनुसार, घरी आल्‍यानंतर हेमा यांनी टीव्‍ही लावला. चॅनेल बदलत असताना अचानक टीव्‍हीवर 'फौजी' मालिका लागली होती. हेमा यांना एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्‍या तरुणाचा चेहरा होता -शाहरूखचा. हेमा यांनी तत्‍काळ ऑफिसमधल्‍या माणसांना शाहरूखचा पत्ता शोधायला सांगितलं. शाहरुख त्यावेळी दिल्‍लीमध्ये राहत होता. त्‍याचा फोन नंबरही मिळाला होता. त्‍यानुसार, प्रभा यांनी (हेमा यांची मावस बहिण) शाहरुखला फोन लावला. खुद्‍द शाहरुखने फोन उचलला. हेमा यांच्‍या ऑफिसमधून फोन आलाय, याचा शाहरुखला विश्‍वासच बसेना. आपली कुणीतरी चेष्‍टा करतयं, असं वाटल्‍याने शाहरुखने प्रभा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरचं हा फोन हेमा यांच्‍या हुकमाप्रमाणे करण्‍यात आलाय, हे पटवून देण्‍यासाठी प्रभा यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. अखेर प्रभा म्‍हणाल्‍या, 'तुला मी हेमाचा डायरेक्‍ट नंबर देते. तू स्‍वत:च फोन करून खात्री करून घे. मग शाहरुखने होकार देत हेमा यांना फोन केला.' 

Image result for shahrukh khan fauji

जेव्‍हा हेमा यांना पहिल्‍यांदाच भेटला शाहरुख...

दोन दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमा यांच्‍या घरी आला. हेमा यांना त्‍याचा अभिनय आधीच आवडला होता. हेमा त्‍याला म्‍हणाल्‍या, 'तू जरा केस एका जागी ठेवशील का?' शाहरुखने आपले केस ठिक केले. हेमा यांनी मेकअप मॅनला बोलावलं. त्‍याने शाहरुखच्‍या केसांना जेल लावून केस नीटनेटके बसवले. हे सुरू असताना धर्मेंद्र यांची एन्‍ट्री झाली. 'हा माझ्‍या नव्‍या सिनेमाचा हिरो-शाहरुख खान' असे म्‍हणत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्‍याशी शाहरुखची ओळख करून दिली. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍या चॉईसला दाद दिली. त्‍यावेळी 'दिल आशना है'साठी शाहरुखची हिरो म्‍हणून निवड झाली. 

Image result for shahrukh khan hd

याबद्‍दल एकदा हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या, 'फौजी बनवणार्‍यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्‍टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसले.' 

Image result for shahrukh khan and hema

थाटामाटात चित्रपटाचा मुहूर्त

मुंबईच्‍या एका हॉटेलमध्‍ये मोठ्‍या थाटामाटात हेमा यांच्‍या चित्रपटाचा मुहूर्त झाला. 'दिल आशना है' असं चित्रपटाचं नाव. 'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्‍या 'लेस' या गाजलेल्‍या कादंबरीवर आधारीत होती. तीन स्‍त्रियांमध्‍ये विशिष्‍ट परिस्‍थितीत निर्माण होणार्‍या भावबंधनाची ती कथा आहे. या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया या त्‍याकाळी गाजलेल्‍या अभिनेत्री आणि दिव्‍या भारतीची निवड केली होती. हा चित्रपट स्‍त्री प्रधान होता. तर शाहरुख खान, कबीर बेदी, जीतेंद्र, असीफ हे मुख्‍य नायक होते. स्‍त्री प्रधान चित्रपट म्‍हणजे त्‍याकाळी 'भलतचं काहीतरी' असं असायचं. त्‍याची या नायकांना जाणीव होती. याबद्‍दल हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'कुणी नाराज नव्‍हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे नट सेटवर आले की, वातावरण बदलायचं. मी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करीत होते, तरीही कॅमेर्‍यातून त्‍यांच्‍याकडे पाहताना माझ्‍यातली अभिनेत्री जागी व्‍हायची आणि त्‍यांचं निरीक्षण करायची. आणि या नात्‍यानंसुध्‍दा कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरचे भाव न्‍याहाळण्‍याऐवजी कॅमेर्‍यामागून ते वाचणं वेधक वाटत होतं.'
१९९१ मध्‍ये 'दिल आशना है' रिलीज झाला.

Image result for shahrukh khan hd

दरम्‍यान, दीवानामध्‍ये काम करण्‍याची शाहरुखला संधी मिळाली. ऋषी कपूर या प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबर काम करून शाहरुखने त्‍याला मिळालेल्‍या संधीचं सोनं केलं. 'दीवाना'साठी शाहरुखला फिल्‍मफेअर पुरस्‍कार देखील मिळाला. त्‍याचवेळी दिग्‍दर्शक अली अब्‍बास यांची नजर शाहरुखवर पडली. अली अब्‍बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता. शाहरुखला त्‍यांच्‍या चित्रपटात घेण्‍यात आलं. १९९३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्‍यामुळे इंडस्‍ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली. 

Image result for shahrukh khan hd

१९९३ मध्‍ये यश चोप्रा यांच्‍या 'डर' चित्रपटात काम करण्‍याची संधी शाहरुखला मिळाली. 'क...क...क...किरण' हा शाहरुखचा डायलॉग चांगला गाजला. १९९५ मध्‍ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'मध्‍ये काम दिलं. हा चित्रपट ब्‍लॉकबस्‍टर ठरला. 

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

१९९९ मध्‍ये शाहरुख खानने चित्रपट निर्मितीकडे लक्ष वळवले. अभिनेत्री जूही चावलासोबत मिळून शाहरुखने ड्रीम्‍स अनलिमिटेडची स्‍थापना केली. या बॅनरअंतर्गत शाहरुखने 'फिर भी दिल है हिंदुस्‍तानी' चित्रपट बनवला. चांगली पटकथा आणि अभिनय असतानाही बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. याच बॅनरखाली त्‍यांनी 'अशोका' चित्रपट बनवला. हा देखील चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. परंतु, तिसरा चित्रपट 'चलते चलते' सुपरहिट झाला. 

२००४मध्‍ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना' बॉक्‍स ऑफिसरवर आणला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्‍लू बार्बर,' 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'हॅप्‍पी न्‍यू इयर,' 'दिलवाले' यासारखे चित्रपट बनवले. 

२००७ ला त्‍याचा लंडनमध्‍ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्‍यात आला. 

Image result for shahrukh khan wax statue

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता

शाहरूखला त्‍याच्‍या सिनेकरिअरमध्‍ये आठ वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता फिल्‍म फेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. शाहरुखची ऑनस्‍क्रीन जोडी काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत चांगली जमली. 

Image result for shahrukh khan hd

संकलन : स्वालिया शिकलगार