Fri, Nov 24, 2017 20:08होमपेज › Soneri › शाहिद कपूरने सावरला मीराचा गाऊन

शाहिद कपूरने सावरला मीराचा गाऊन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


मुंबई : पुढारी ऑनलाइन वृत्त

न्यू यॉर्क मध्ये नुकताच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी प्रत्येक बॉलिवूड कलाकार लक्षवेधी कपड्यांमध्ये दिसतो. या सोहळ्यात शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा देखील सहभागी झाले होते. यावेळी मीरा विशिष्ट गाऊनमध्ये ग्रीन कार्पेटवर अवतरली . पण कारमधून उतरताना तो गाऊन तिच्या पायात अडखळला . हे पाहताच शाहिदने मीराचा गाऊन सावरून तीला मदत केली.

आयफा कार्यक्रमासाठी मीराने एका केशरी रंगाचा गाऊन परिधान केला होता. ग्रीन कार्पेटवर येण्यापुर्वी गाडीतुन उतरताना मीराला तिचा ड्रेस सांभाळता आला नाही.  यावेळी शाहिदने मीराचा गाऊन पकडून तिला मदत केली. यावेळी शाहिदच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो काढले . सध्या हे फॅटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या घटनेनंतर शाहिद मीराने आयफा ग्रीन कार्पेटवर या दोघांनी सेल्फीही काढले. यामध्ये शाहिद कपूरलाउडता पंजाबया चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर मीराने शाहिदचे खास पद्धतीने अभिनंदनही केले.