Fri, Nov 24, 2017 20:04होमपेज › Soneri › फक्त एका सीनसाठी वापरले ६० कॅमेरे

‘या’ मराठी चित्रपटात वापरले तब्बल ६० कॅमेरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठी दिग्दर्शक संजय जाधव प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘दुनियादारी’चित्रपटातील ‘जिंदगी’ हे गाणे अनेक कलाकारांनी गायले होते. चित्रपटसृष्टीत असा प्रयोग प्रथमच करण्यात आला होता. संजयने आगामी ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील एका ‘सीन’साठी एक दोन नव्हे तर तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत. 

‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील ६० कॅमेरे वापरून चित्रीत करण्यात आलेला सीन नक्की कोणता, या सीनमध्ये काय खास आहे, तसेच हा सीन कोणावर चित्रीत करण्यात आला आहे. याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार हे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 

६० कॅमेरे घेऊन चित्रित करण्यात आलेला ‘ये रे ये रे पैसा’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. संजय जाधव चाहत्यांसाठी आता अजून नवीन काय आणणा हेच पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.