Mon, Aug 19, 2019 15:16होमपेज › Soneri › 'हेट स्टोरी-२'च्या अभिनेत्रीला कन्यारत्न!

'हेट स्टोरी-२'च्या अभिनेत्रीला कन्यारत्न!

Published On: Apr 20 2019 3:37PM | Last Updated: Apr 20 2019 3:37PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'सेक्रेड गेम्स'मधील अभिनेत्री सुरवीन चावलाने आपल्या चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. सुरवीनने १५ एप्रिलला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुरवीनला कन्‍यारत्‍न झाले आहे. तिने खुद्‍द आपल्‍या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

बाळाचे नाव 'ईवा' असे ठेवले आहे. सुरवीनने शेअर केलेल्या फोटोत बाळाचे पाय दिसत आहेत. परंतु, चेहरा दिसत नाही.  सुरवीनने एका मुलाखतीत सांगितले की, 'हा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्हाला खूप आशीर्वाद मिळाले आहेत.'

जुलै २०१५ रोजी सुरवीनने अक्षय ठक्करसोबत लग्न केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरवीन आणि अक्षय यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केले होते. तर २०१७ ला दोघांच्या लग्नाचा खुलासा झाला होता. २०१३ ला सुरवीन आणि अक्षय दोघेजण चांगले मित्र होते. त्यानंतर दोघांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी गुपचूप लग्न केले.

  

मध्‍यंतरी, सुरवीनच्या प्रेग्नेंसीचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.   

एकता कपूरचा 'कहीं तो होगा' या शोमधून सुरवीनने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. या शोमध्ये आमना शरीफ (कशिश) यांची बहिण (चारू)ची भूमिका साकारली होती. यानंतर सुरवीन 'कसौटी जिंदगी की' या मालिकात दिसली. तसेच अनिल कपूरचा शो आणि २४ वेब सीरीजमध्येही सुरवीनने काम केले आहे.

यानंतर सुरवीनने 'हेट स्टोरी-२', 'पार्च्ड' आणि 'उंगली' यासारख्या चित्रपटात काम केले होते. तसेच ती गेल्या वर्षीच्या 'सेक्रेड गेम्स'  या चित्रपटातही झळकली होती. हेट स्‍टोरीतील तिचे एक गाणे प्रचंड गाजले. 

(Video : surveenchawla instagram वरून साभार)