Sun, Jun 16, 2019 09:19होमपेज › Soneri › #Saaho सर्वात महागड्‍या ॲक्‍शन चित्रपटाचा व्‍हिडिओ 

#Saaho सर्वात महागडा ॲक्‍शन चित्रपट

Published On: Jun 13 2019 2:05PM | Last Updated: Jun 13 2019 3:20PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बाहुबली फेम प्रभास मचअवेटेड चित्रपट 'साहो'चे टीजर रिलीज झाले. टीजरमध्‍ये प्रभाससोबत श्रद्धा कपूरचाही जबदरदस्‍त अभिनय दिसत आहे. प्रभास आणि श्रद्धाशिवाय जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर, टीनू आनंद आणि मुरली शर्मा यासारखे स्टार्स दिसणार आहेत. बॉलिवूडबरोबर दाक्षिणात्‍य चित्रपटातील कलाकारही साहोमध्‍ये दिसणार आहेत. 

'साहो' बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा ॲक्‍शन चित्रपट असल्‍याचे म्‍हटले जात आहे. काही सीन सोडले तर व्‍हिडिओमध्‍ये जबरदस्‍त असे ॲक्शन सीन पाहायला मिळत नाहीत. 

असा आहे टीजर

एक मिनिट ३९ सेकंदच्‍या या टीजरमध्‍ये केवळ दोनच डायलॉग आहेत. टीजरची सुरुवात श्रद्धा कपूरच्‍या सीनने होते. यामध्‍ये श्रद्धा खूपच सुंदर दिसते. ती म्‍हणताना दिसते की, 'मेरे गम और खुशियां बांटने के लिए मेरे साथ कोई नहीं है.' यावर प्रभास म्‍हणताना दिसतो, मी आहे. यानंतर चित्रपटाच्‍या काही ॲक्शन सीन्सना दाखवण्‍यात आले आहे. परंतु, हे सीन्‍स पाहिल्‍यानंतर चित्रपटाची कहाणी काय असेल, याचा अंदाज अजिबात लागत नाही. 

सर्वात महागडा ॲक्‍शन चित्रपट?

साहो हा बॉलिवूडचा सर्वात महागड्‍या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे बजेट ३०० कोटी म्‍हटले जात आहे. सुजीत दिग्‍दर्शन करत आहेत. सुजीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. त्‍यांनी २०१४ मध्‍ये 'रन राजू रन' या चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले होते. हा तेलुगु चित्रपट होता. साहो १५ ऑगस्‍टला रिलीज केला जाणार आहे.