Sat, Dec 14, 2019 04:54होमपेज › Soneri › पूरग्रस्त महिलांनी जवानांना बांधल्या राख्या (video)

पूरग्रस्त महिलांनी जवानांना बांधल्या राख्या (video)

Published On: Aug 12 2019 3:46PM | Last Updated: Aug 12 2019 3:46PM

रितेश देशमुखमुंबई : पुढारी ऑनलाईन

कृष्णा-वारणा नदीमुळे सांगली आणि पंचगंगा नदीमुळे कोल्हापूर शहराला गेल्या काही दिवसापासून भीषण पूरस्थिती ओढवली होती. या महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवून त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्याच्या सुविधा लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदलाच्या जवानांनी पुरविल्या. या महापुरातून सुखरूप बाहेर पडलेल्या सातारा आणि कोल्हापूरातील मायभगिनींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आता जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. याचा सातारा येथील एक व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

रितेशने या व्हिडिओसोबत एक कॅप्शन लिहिली आहे की, ‘प्राण वाचवणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत या महिला साहसी जवानांना राख्या बांधत आहेत. हीच आपली संस्कृती आहे. जय हिंद’. 

सांगली आणि कोल्हापूर या जिल्हाना पुरातून बाहेर काढण्यासाठी हे जवान जणू देवदूतच बनले होते. या मदतकार्यात जवानांसोबत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय पथके आणि स्थानिक नागरिकानी ही मदत केली आहे. तर सध्या या दोन्ही शहरातील पूरस्थितीत सुधारणा होत आहे.   

(video : Riteish Deshmukh twitter वरून साभार)