Mon, Jul 06, 2020 03:53होमपेज › Soneri › बागी-३ मध्‍ये रितेश देशमुख नव्‍या लुकमध्‍ये! 

बागी-३ मध्‍ये रितेश देशमुख नव्‍या लुकमध्‍ये! 

Published On: Jun 13 2019 3:50PM | Last Updated: Jun 13 2019 3:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरनंतर आता बागी ३ मध्‍ये रितेश देशमुखचीही एन्‍ट्री झाली आहे. बागी ३ चे शूटिंगचे काम सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत गंभीर आणि विनोदी भूमिका करणारा रितेश बागी-३ या चित्रपटामध्‍ये विलेनच्‍या भूमिकेत दिसणार आहे. याआधी श्रद्धा कपूर आणि रितेशने 'एक विलेन'मध्‍ये काम केले आहे. बागी-३ चे दिग्‍दर्शन अहमद खान करत आहेत. 

खास बाब म्‍हणजे, निर्माता साजिद नाडियाडवालासोबत रितेशचा हा ६ वा चित्रपट आहे. साजिदने एका वेबसाईटशी बोलताना म्‍हटले, रितेश हाउसफुल फ्रेंचाइजीच्‍या प्रत्‍येक चित्रपटाचा हिस्सा आहे. आता तो बागी-३ मध्‍येही दिसणार आहे. 

रितेशने मिलाप जावेरी यांचा 'मरजावां' चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. या चित्रपटामध्‍ये तो सिद्धार्थ मल्‍होत्रासोबत दिसणार आहे. आता बागी-३ चे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग चार देशांमध्‍ये होणार आहे. हा चित्रपट ६ मार्च, २०२० ला रिलीज होणार आहे. 

बागी-३ साठी  टायगर स्पेशल ट्रेनिंगदेखील घेत आहे. चित्रपटाचे बजेटदेखील वाढवण्‍यात आले आहे. 

टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूर स्टारर बागी हा चित्रपट २०१६ मध्‍ये रिलीज झाला होता. ७६ कोटींचा गल्‍ला चित्रपटाने जमवला होता. तर २०१८ मध्‍ये आलेल्‍या बागी २ ने १५० कोटींहून अधिक कमाई केली होती. 

View this post on Instagram

Under the spot 💡

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on