Fri, Nov 24, 2017 20:04होमपेज › Soneri › ऋषी कपूर यांनी राहुल गांधींना सुनावले

ऋषी कपूर यांनी राहुल गांधींना सुनावले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘राजकारण असो वा बॉलिवूड सर्वच ठिकाणी घराणेशाही दिसून येते’,असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी अमेरिकेत भाषण देताना केले होते. राहूल  गांधींच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी अनेक ट्विट करून राग व्यक्त केला आहे. 

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये १२ सप्टेंबर रोजी राहूल गांधी यांचे भाषण होते. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना उद्योगपती मुकेश अंबानी, राजकीय नेते अखिलेश यादव, अभिषेक बच्चन यांचा उल्लेख करत, ‘भारत याच पद्धतीने चालत आहे’, असे वक्तव्य केले होते. 

‘राहूल गांधी,१०६ वर्षांच्या भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासामध्ये कपूर घराण्याचे ९० वर्षांचे योगदान आहे आणि प्रत्येक पिढीला जनतेनी निवडलेले आहे, असे उत्तर ऋषी कपूर यांनी दिले आहे.
‘जबरदस्ती आणि गुंडगिरी करून नाही तर काम आणि अथक परिश्रम करून इज्जत कमवावी लागते’ असे ट्विटही ऋषी कपूर यांनी केले आहे.